शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

विल्हेवाटीची सक्ती कागदावरच, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरणही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 4:35 AM

कल्याण -  कच-याची विल्हेवाट स्वत:च लावा, असे आवाहन करून नागरिकांना दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची भीती घालणा-या केडीएमसीचा १ जूनचा मुहूर्तही हुकला आहे. तसेच ओला-सुका कच-याचे वर्गीकरण कागदावरच असताना या कच-याची वाहतूक आणि त्याच्या डम्पिंगची प्रक्रिया ही एकत्रितच होत आहे. केडीएमसी प्रशासनाची मानसिकता नसल्याने ‘वर्गीकरण’ प्रक्रियेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.ओला आणि ...

कल्याण -  कच-याची विल्हेवाट स्वत:च लावा, असे आवाहन करून नागरिकांना दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची भीती घालणा-या केडीएमसीचा १ जूनचा मुहूर्तही हुकला आहे. तसेच ओला-सुका कच-याचे वर्गीकरण कागदावरच असताना या कच-याची वाहतूक आणि त्याच्या डम्पिंगची प्रक्रिया ही एकत्रितच होत आहे. केडीएमसी प्रशासनाची मानसिकता नसल्याने ‘वर्गीकरण’ प्रक्रियेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.ओला आणि सुका कचºयाचे वर्गीकरण करावे. तसेच केडीएमसी कचरा उचलणार नसल्याने १ मेपासून त्याची विल्हेवाटही नागरिकांनीच लावावी, अशी भूमिका केडीएमसीने घेतली होती. त्याचवेळी कचºयाचे वर्गीकरण न करणाºया आस्थापना व गृहनिर्माण संकुलांवर दंडात्मक कारवाई व प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला होता. मात्र, याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीही पूर्वतयारी आणि जागृती न केल्याने त्याला नागरिकांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे महापालिकेने केवळ बड्या सोसायट्यांना कचºयाच्या विल्हेवाटीची सक्ती केली. तर, उर्वरित नागरिकांना त्याची वर्गीकरण आणि विल्हेवाटीची सवय लागावी, यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली. त्यानुसार, प्रशासनाने १ जूनपासून कचरा उचलणे बंद करणे अपेक्षित होते. परंतु, १५ होऊनही वर्गीकरणाची कृती प्रशासनाने सुरू केलेली नाही.ओला आणि सुका कचºयाची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावली जाते, असे दावे वरिष्ठ अधिकाºयांकडून केले जात असले तरी कनिष्ठ अधिकाºयांची मानसिकता नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. तर, वाहनांची सुविधा नसल्याने अंमलबजावणी करणे सोयीस्कर नसल्याचे आरोग्य निरीक्षकांचे म्हणणे आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून याप्रकरणी काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी सुविधा पुरवणे गरजेचे होते, पण तशी व्यवस्था केली गेली नसल्याने कचºयाचे वर्गीकरण करूनही नागरिकांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात असल्याचेही पाहावयास मिळत आहे. बहुतांश ठिकाणी नागरिकांकडून दिल्या जात असलेल्या या स्वतंत्र कचºयाची वाहतूक एकत्रितच होत आहे. त्यामुळे त्याची विल्हेवाटही आधारवाडी डम्पिंगवरच होत आहे, ही वस्तुस्थिती आहे.दरम्यान, यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोसायट्यांमध्ये कचºयाचे वर्गीकरण दिले जाते, असा दावा केला. केवळ चाळी तसेच झोपडपट्टी वसाहतींमध्ये याची अंमलबजावणी प्रभावीपणे अद्याप सुरू झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.नियोजनाअभावी समस्या कायम : आम्ही ओला आणि सुका कचरा वेगळा करून देतो. त्याचबरोबर प्लास्टिकचा कचराही स्वतंत्रपणे दिला जातो. परंतु, पालिकेच्या घंटागाड्यांमधून ओला आणि सुका कचरा एकत्रितच नेला जात आहे. अधिक चौकशी करता त्यांच्याकडे घंटागाड्यांची पुरेशी सुविधा नाही. त्या नादुरुस्त आहेत. एकीकडे साधनांअभावी ठोस अंमलबजावणी होत नसताना दुसरीकडे नियोजनाचा अभावही दिसून येत आहे, असे कल्याण पूर्वेकडील ‘लोकवाटिका’ गृहसंकुलातील रहिवासी मंजूषा ओरपे यांनी सांगितले.ठाण्याच्या धर्तीवर कार्यवाही व्हावीनागरिकांनी कचºयाचे वर्गीकरण करावे. ओल्या कचºयापासून घरच्याघरी खत करावे. तर, सुक्या कचºयातील ८० टक्के प्लास्टिक ऊर्जा फाउंडेशनसारख्या संस्थांना द्यावे. तर, उर्वरित २० टक्के कचरा पुनर्प्रक्रियेसाठी दिल्यास शून्य कचरा मोहीम राबवणे शक्य होऊ शकते. परंतु, त्यात नागरिकांचा सहभाग असायला हवा.ठाणे महापालिकेने १०० किलोपेक्षा जास्तीच्या कचºयाची निर्मिती करणाºया तसेच पाच हजार चौरस मीटरच्या क्षेत्रातील सोसायट्यांसाठी कचºयाचे वर्गीकरण करणे आणि त्याची तेथेच विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट केले आहे. केडीएमसीनेही तशी कृती करावी, असे मत पर्यावरण दक्षता मंडळाच्या समन्वयक रूपाली शाईवाले यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न