मीरा भाईंदरमध्ये शुक्रवार ते शनिवार २४ तास पाणी नाही 

By धीरज परब | Updated: May 9, 2023 21:27 IST2023-05-09T21:26:34+5:302023-05-09T21:27:50+5:30

पाहा काय आहे कारण?

There is no water in Mira Bhayandar 24 hours from Friday to Saturday | मीरा भाईंदरमध्ये शुक्रवार ते शनिवार २४ तास पाणी नाही 

मीरा भाईंदरमध्ये शुक्रवार ते शनिवार २४ तास पाणी नाही 

मीरारोड - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बारवी पाणी पुरवठा योजने अंतर्गत नवीन टाकलेल्या गुरुत्व जलवाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी कडून केला जाणारा पाणी पुरवठा शुक्रवार १२ मे रोजी दुपारी १२ वा . पासून ते शनिवार १३ मे दुपारी १२ वाजे पर्यंत असा २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

या दरम्यान स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार असला तरी शहरास अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे असे आवाहन पालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी केले आहे. 

Web Title: There is no water in Mira Bhayandar 24 hours from Friday to Saturday