भिवंडीत फायबर साहित्याला भीषण आग
By नितीन पंडित | Updated: February 10, 2023 20:07 IST2023-02-10T20:06:43+5:302023-02-10T20:07:03+5:30
भिवंडीत फायबर साहित्याला भीषण आग लागली आहे.

भिवंडीत फायबर साहित्याला भीषण आग
भिवंडी : मोकळ्या जागेत असलेल्या सुक्या गवताला लागलेली आग पेटत पेटत एका फायबर गोदामांपर्यंत पोहचल्याने फायबर गोदाम आगीत जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी बोरपाडा परिसरात घडली आहे. ही आग एवढी भयानक होती की आगीत डेकोरेशनसाठी लागणारे फायबरचे साचे व साहित्य जाळून खाक झाले आहेत.
या आगीची माहिती अग्निशमन दलास उशिरा मिळाल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली होती.दरम्यान घटनास्थळी फायरब्रिगेड दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले आहे.