लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात आसनावरून दादागिरी; कथित भाईंना आवर घालण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 12:56 AM2019-12-14T00:56:26+5:302019-12-14T00:59:38+5:30

लोकलमध्ये जागा अडवून ठेवणे, आसनावर रूमाल, बॅग, पिशव्या ठेवणे, अशा घटना नेहमीच घडत आहेत.

There are widespread controversy from the seats during the local voyage | लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात आसनावरून दादागिरी; कथित भाईंना आवर घालण्याची मागणी

लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात आसनावरून दादागिरी; कथित भाईंना आवर घालण्याची मागणी

Next

डोंबिवली : लोकल प्रवासादरम्यान आसनावरून होणारे वाद विकोपाला जात असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अंबरनाथमध्येही असेच कटू अनुभव काही दिवसांपासून सातत्याने पुरुष प्रवाशांना सहप्रवाशांकडून येत आहेत. या मनमानीविरोधात काही पुरुष प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे दाद मागत कथित भाईंना आवर घालण्याची मागणी केली आहे. अनुप मेहेत्रे या प्रवाशाने या दादागिरी संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना त्यांना असा अनुभव येत असल्याचे सांगितले.

अंबरनाथमध्ये सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांनी येणाऱ्या लोकलमध्ये जागा अडवून ठेवणे, आसनावर रूमाल, बॅग, पिशव्या ठेवणे, अशा घटना नेहमीच घडत आहेत. त्यामुळे कंटाळून अखेरीस या समस्येला वाचा फोडावी लागली. दादागिरी करणाऱ्या प्रवाशांच्या मनमानीला त्यांनी विरोध करताच त्यांना अर्वाच्य बोलणे, असभ्य भाषेला सामोरे जावे लागल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराबाबत त्यांनी सोशल मीडियावर गुरुवारी सायंकाळी आवाज उठवला. जागा कशी अडवली जाते याचे दाखले देणारे फोटोही त्यांनी व्हायरल करत दादागिरी कथित भाईंना वेळीच आवर घालावा, अशीही मागणी त्यांनी केली.

केवळ अंबरनाथ येथून सुटणाऱ्या लोकलमध्येच नव्हे तर कल्याण, डोंबिवली, बदलापूर अशा सर्वच लोकलमध्ये असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. ग्रुप करून दबाव आणणे, मोठ्याने बोलणे, कोणाचीही चेष्टा मस्करी करण्याचे प्रकार वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. या वृत्तीचा, अशा घटनांचा त्यांनी निषेध केला असून, कोणालाही जागेवरून अडवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. मित्रांसाठी जागा आडवायची असेल तर त्यांनी ती जरूर आडवावी, पण अन्य प्रवाशांना त्रास देऊ नये. रेल्वेनेही डब्यांमधील उद्घोषणा यंत्राद्वारे कोणीही आसन आडवून ठेवू नका, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य अशा सूचना देणे महत्त्वाचे आहे. त्यातून प्रवाशांचे आपापसातील वाद कमी होतील, आणि समस्या मार्गी लागेल, असेही मेहेत्रे म्हणाले.

कायदेशीर लढ्याचीही तयारी

प्रवाशांच्या या दादागिरीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देऊन वेळ पडल्यास रितसर कायदेशीर बाबी करण्याचीही काही प्रवाशांनी तयारी दर्शवली आहे. या संदर्भात विविध प्रवासी संघटनांकडेही अशा तक्रारी आल्या आहेत. त्यावर प्रवाशांनी थेट लोहमार्ग पोलीस, स्थानकातील आरपीएफ पोलीस यांना सतर्क करावे, असा पर्याय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सुचवला आहे.

Web Title: There are widespread controversy from the seats during the local voyage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.