Theft of Rs 1 lakh from two private offices in Thane | ठाण्यातील दोन खासगी कार्यालयातून लाखाच्या ऐवजाची चोरी

राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा

ठळक मुद्दे राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हाटॅब आणि तापमान मोजण्याच्या थर्मल गनचीही चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : खोपट येथील अमरग्यान इंडस्ट्रीयल इस्टेट येथील खासगी कंपनीच्या कार्यालयातून तसेच इपिकॉन कंपनीच्या कार्यालयातून चोरटयांनी एक लाख सात हजार ५०० रुपये किंमतीच्या ऐवजाची चोरी केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात ३० नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
खोपट येथील ‘सोहम अ‍ॅनालिटिकल सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. ’ यांच्या कार्यालयातून चोरटयांनी साडे पाच हजारांची रोकड तसेच ९६ हजारांचे धनादेश असा १ लाख एक हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला. तसेच इपिकॉन कन्सलटंट प्रा. लि. यांच्या कार्यालयाच्या शटरचे कुलूप तोडून चोरटयांनी टॅब आणि तापमान मोजण्याची थर्मल गन अशा सहा हजारांच्या ऐवजाची चोरी केली. राबोडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय कोळी हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Theft of Rs 1 lakh from two private offices in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.