पुरम मोबाईल दुकानात चोरी

By सदानंद नाईक | Updated: February 5, 2024 17:50 IST2024-02-05T17:49:15+5:302024-02-05T17:50:55+5:30

उल्हासनगर पूर्वेतील व्हीनस चौक परिसरात मुकेश थवानी यांचे पुरम मोबाईल नावाचे दुकान आहे

Theft at Puram mobile shop | पुरम मोबाईल दुकानात चोरी

पुरम मोबाईल दुकानात चोरी

उल्हासनगर : कॅम्प नं-४, व्हीनस चौक परिसरातील पुरम मोबाईल दुकानात शनिवारी रात्री चोरी झाली असून रोख रक्कमेसह १ लाख ६८ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगर पूर्वेतील व्हीनस चौक परिसरात मुकेश थवानी यांचे पुरम मोबाईल नावाचे दुकान आहे. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या खिडकीवाटे आत प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातील १ लाख २ हजार रुपये रोख रक्कम, सोन्याचे नाणे, सोन्याची अंगठी व मोबाईल असा एकून १ लाख ६८ हजाराचा ऐवज लंपास केला. चोरीचा प्रकार उघड झाल्यावर मुकेश यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची तक्रार दिल्यावर, पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Theft at Puram mobile shop