काळजाचा ठोका चुकला, तरुणाने वाचवले दृष्टीहीन वयोवृद्ध महिलेचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 22:03 IST2022-02-23T22:02:32+5:302022-02-23T22:03:23+5:30
Boy saved Life of blind lady :याच परिसरातील एका तरुणाने मोठ्या कौशल्याने या वृद्ध महिलेला सुखरूप पत्र्यावरून खाली उतरवले.

काळजाचा ठोका चुकला, तरुणाने वाचवले दृष्टीहीन वयोवृद्ध महिलेचे प्राण
बदलापूर : वांगणीत नकळतपणे दुमजली घराच्या पत्र्यावर गेलेली महिला दुमजली घराच्या पत्र्याच्या टोकावर अडकून पडल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. मात्र याच परिसरातील एका तरुणाने मोठ्या कौशल्याने या वृद्ध महिलेला सुखरूप पत्र्यावरून खाली उतरवले.
वांगणीच्या वार्ड क्रमांक ४ मधील श्रीनगर भागात राहणाऱ्या जानकीबाई झांजे या मानसिक रुग्ण असून दृष्टिहीन आहेत. मागच्या दाराने दुमजली घरात येताना नकळतपणे त्या घराच्या छताच्या पत्र्यावर गेल्या. आपण नेमके कुठे आलो आहोत हे त्यांना कळत नव्हते. त्या पत्र्याच्या टोकाजवळ आल्या मात्र पुढे पायाला जमीन लागत नसल्याने तिथेच बसून राहिल्या. ही महिला थोडे जरी पुढे सरकली असती तर खाली पडली असती. परंतु सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने शेजारी राहणाऱ्या राहुल लोते या तरुणाने या वृद्ध महिलेला वाचविण्यासाठी धाव घेतली.राहुलने पत्र्यावर जाऊन मोठ्या कौशल्याने या महिलेला सुखरूप खाली उतरवले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राहुलचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तरुणाने वाचवले दृष्टीहीन वयोवृद्ध महिलेचे प्राण pic.twitter.com/EwhMX6dL9w
— Lokmat (@lokmat) February 23, 2022