राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवल्याने भिवंडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाटले पेढे

By नितीन पंडित | Updated: February 13, 2023 18:04 IST2023-02-13T18:03:22+5:302023-02-13T18:04:04+5:30

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविल्याने सोमवारी भिवंडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

The removal of Governor Koshyari from the post has left the NCP Youth Congress in Bhiwandi reeling | राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवल्याने भिवंडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाटले पेढे

राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवल्याने भिवंडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाटले पेढे

भिवंडी- राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविल्याने सोमवारी भिवंडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अजीत झा यांनी शहरातील नारपोली भंडारी चौक व बाजारपेठेत नागरिक व दुकानदारांना पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.

राज्यपाल कोश्यारी हे सतत महाराष्ट्र राज्याची प्रतिमा मलीन होईल व राज्यातील महापुरुषांचा अवमान होईल असे वादग्रस्त वक्तव्य करत होते, त्यामुळे ते राज्यपाल पदावरून पाय उतार झाल्याने आजचा आनंद उत्सव साजरा करत आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अजित जा यांनी यावेळी दिली आहे.याप्रसंगी भिवंडी शहर कार्याध्यक्ष हारून खान व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The removal of Governor Koshyari from the post has left the NCP Youth Congress in Bhiwandi reeling

टॅग्स :thaneठाणे