बदलापूर - बदलापूर नगरपालिकेच्या प्रचाराचा स्तर घसरला असून आता खुल्या व्यासपीठावरूनच शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. त्यामुळे सुसंस्कृत बदलापूर शहराला यंदाच्या निवडणुकीत ‘’शिवराळ’’ प्रचार सहन करावा लागणार आहे.
बदलापुरात आ. किसन कथोरे आणि शिंदेसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील सत्तासंघर्षामुळे वाद पेटला आहे. त्यातच बदलापुरात भाजप विरुद्ध शिंदेसेना अशी सरळ लढत होणार असल्याने दोघे एकमेकांवर आरोप करत आहेत. दोन दिवसांपूर्वी आ. कथोरे यांनी म्हात्रे यांच्यावर एका कंपनीची जागा बळकावल्याचा आरोप केला होता. म्हात्रे यांनीही उत्तर देत कंपनीकडून ही जागा करारनाम्यानुसार घेतल्याचे स्पष्ट केले.
खरे-खोटे सिद्ध करण्याचे आव्हानहिम्मत असेल तर जागेवर येऊन काय खरे आणि काय खोटे हे सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान कथोरे यांना दिले. संतापाच्या भरात सुरू असलेल्या या भाषणात कथोरे हे गेल्या वीस वर्षांपासून बदलापूरकरांना फसवत असल्याचा आरोप करत शिवराळ भाषा वापरली. संतापाच्या भरात वापरलेली ही शिवराळ भाषा निवडणुकीच्या प्रचाराचा स्तर घसरवत असल्याचे दिसून आले. अजूनही उमेदवारी अर्जाचे काम पूर्ण झालेले नसताना त्याआधीच प्रचाराचा घसरलेला स्तर यांमुळे सुसंस्कृत बदलापूरकरांच्या मनात राजकीय प्रचाराविषयी संताप निर्माण होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Badlapur's election campaign descends into vulgarity as leaders clash. Allegations of land grabbing fuel the fire, with public challenges and abusive language sparking outrage and threatening Badlapur's reputation.
Web Summary : बदलापुर चुनाव प्रचार में नेताओं के बीच टकराव से अश्लीलता आई। ज़मीन हड़पने के आरोपों ने आग में घी डाला, सार्वजनिक चुनौतियों और अपमानजनक भाषा से आक्रोश फैल गया और बदलापुर की प्रतिष्ठा खतरे में पड़ गई।