शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

वनमंत्र्यांनी कांदळवनाबाबत स्पष्ट भूमिका मांडत प्रताप सरनाईकांचे मुद्दे काढले खोडून

By धीरज परब | Updated: March 31, 2023 16:11 IST

आ. सरनाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचनेद्वारे कांदळवन बाबत मुद्दे उपस्थित केले होते.

मीरारोड -  कांदळवन मध्ये जमिनी गेलेल्या शेतकरी आणि मालकांचे नुकसान भरपाईचे एकही प्रकरण आले नसल्याचे स्पष्ट करत आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खोडून काढले.

आ. सरनाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचनेद्वारे कांदळवन बाबत मुद्दे उपस्थित केले होते. त्यावर वनमंत्री यांनी सविस्तर म्हणणे मांडले.  मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा नंतर कांदळवन संरक्षण व संवर्धन केले जात आहे. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात अवकाळी पावसामुळे अथवा सुसाटयाच्या वाऱ्यामुळे शेताच्या काही भागामध्ये कांदळवनाच्या बिया पसरुन त्या ठिकाणी कांदळवनाची फार मोठया प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना शेती करताना मोठया प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आलेले नाही असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट करून आ. सरनाईकांचा मुद्दा खोडून काढला. 

घोडबंदर किल्ल्याशेजारी शिवसृष्टी उभारण्याच्या कामाचा प्रस्तावची तपासणी कांदळवन वनपरिक्षेत्र अधिकारी ठाणे यांच्या स्तरावर सुरु आहे. घोडबंदर खाडी किनारा विकसित करण्याच्या अनुषंगाने ना हरकत प्रमाणपत्राकरीता मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून प्रस्ताव प्राप्त झाला असून त्याची सुद्धा पडताळणीची सुरु आहे. तर मेट्रो-९ आणि दहिसर -भाईंदर कोस्टल रोडच्या कामाबाबतचे प्रकरण कांदळवन कक्षास प्राप्त झालेले नाही असे मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे. 

जनहिताचे प्रकल्प वन जमिनीवर करण्याकरीता वन अधिनियम अंतर्गत प्रस्ताव तयार करुन केंद्र शासनाची परवानगी प्राप्त करुन तसेच उच्च न्यायालयाची कांदळवन वृक्ष तोडीबाबत परवानगी घेऊन कामे करता येतात. त्यामुळे जनहिताच्या कामांना अडचण नसल्याचे मुनगंटीवार यांनी एकप्रकारे स्पष्ट केले आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये किंवा भूखंड मालकांच्या खाजगी भूखंडावर कांदळवने निर्माण झाली आहेत, त्यांना इतर शेतक-यांप्रमाणे व इतर खाजगी भूखंड मालकांप्रमाणे आर्थिक व टी.डी. आर. स्वरुपातील मोबदला देण्याची प्रकरणे कांदळवन कक्षास प्राप्त झालेली नाहीत असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारpratap sarnaikप्रताप सरनाईक