बापाने पोटच्या पोरीवर केला अत्याचार; गुन्हा दाखल होताच उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन
By पंकज पाटील | Updated: October 28, 2023 18:36 IST2023-10-28T18:34:57+5:302023-10-28T18:36:16+5:30
Badlapur News: बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बापाने आपल्या दहा वर्षाच्या चिमुकलीवर सहा महिने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरून मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच बापाने रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली आहे.

बापाने पोटच्या पोरीवर केला अत्याचार; गुन्हा दाखल होताच उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन
- पंकज पाटील
बदलापूर - बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बापाने आपल्या दहा वर्षाच्या चिमुकलीवर सहा महिने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरून मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच बापाने रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे पोलीस या दोन्ही घटनांचा तपास करीत आहे. बदलापूर पश्चिम परिसरात राहणाऱ्या एका रिक्षा चालकाचे आपल्या प्रियसी बरोबरच लग्न झाले होते. त्यानंतर त्या दोघांनाही एक मुलगी आणि एक मुलगा असे आपत्य होते.
घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलांची आई नोकरीसाठी दुबईला निघून गेली होती तर मुलांची जबाबदारी बापावर सोपवली होती. याच दरम्यान या बापाने आपल्या दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली. संबंधित पीडित मुलीने या प्रकाराची माहिती आपल्या आजीला दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. आजीने लागलीच आपल्या मुलीला झालेल्या घटनांची माहिती दिली आणि तात्काळ दुबईहून भारतात येण्यास सांगितले. पीडित मुलीची आई भारतात येतात तिने मुली सोबत संवाद साधल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याची कबुली दिली. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिची आई पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित बापाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
एकीकडे गुन्हा दाखल होत असताना दुसरीकडे घाबरलेल्या बापाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी संबंधित बापाने मोबाईलवर व्हिडिओ बनवून तो मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवला असून त्या व्हिडिओची देखील पोलीस चौकशी करीत आहेत. एकीकडे मुलीवर अत्याचार आणि दुसरीकडे अत्याचार करणाऱ्या बापाने आत्महत्या केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी लागली आहे. अत्याचार प्रकरणी बदलापूर पोलीस तपास करीत असून आत्महत्या प्रकरणी रेल्वे पोलीस तपास करीत आहे.