शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 22:06 IST

एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर - महापालिका स्थापनेनंतर गेल्या ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्यांनी उल्हासनगरला काय दिले? आज शहराची अवस्था गावापेक्षाही वाईट झाली आहे. पण आता हे चित्र बदलायचे आहे. शहरात गुंडेशाही मोडीत काढून कायद्याचे राज्य प्रस्थापित करणार असून उल्हासनगरला उन्नत करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींच्या निधीची घोषणा करत त्यांनी शहराच्या कायापालटाचा रोडमॅप सादर केला. पायाभूत सुविधांसाठी दिल्याचे सांगून शहराच्या दुरवस्थेवर बोट ठेवत मुख्यमंत्र्यांनी विकासाचा मोठा आराखडा मांडला. एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली. शहरवासियांचा प्रवास सुखकर करण्यासाठी शहराला मेट्रो नेटवर्कशी जोडले जाणार आहे. तसेच, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी इ-बसेस सुरू करण्यात येणार असून ट्रान्सपोर्ट सुविधेचे जाळे विस्तारले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

भुयार गटार योजना शहरातील सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठी गुंतवणूक केली जात असल्याचे संकेत दिले आहे. अमृत योजनेअंतर्गत ८६८ कोटी रुपये खर्चून भुयारी गटार योजना राबवण्यात येत असून मलशुद्धीकरण केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच नदीत सोडले जाईल. 

विविध योजनापाणीपुरवठ्यासाठी २२० कोटी आणि नवीन जलस्रोत विकसित करण्यासाठी ६३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ७२४ कोटी रुपये खर्चून गरजू लोकांसाठी ३ हजार घरे बांधली जाणार आहे. 

अवैध बांधकामांवर तोडगा आणि नवीन नीती शहरातील जुन्या अवैध इमारती नियमित करण्यासोबतच, भविष्यात अवैध बांधकामे होऊ नयेत, यासाठी सरकार नवे धोरण राबवणार आहे. यामुळे सामान्यांच्या घरांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. 

विविधेत एकता उल्हासनगर हे विविधतेत एकता जपणारे शहर आहे. येथे सर्व धर्मीय आणि भाषिक नागरिक प्रेमाने राहतात. अशा शहराचा विकास करणे आमचे कर्तव्य आहे. येथे गुंडाराज चालणार नाही, फक्त विकासाचे आणि कायद्याचे राज्य चालेल. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : CM vows to end Ulhasnagar's 'Gundaraj,' promises development and new policies.

Web Summary : CM Devendra Fadnavis pledged to end Ulhasnagar's 'Gundaraj' and usher in development. He announced ₹4,000 crore for infrastructure, including metro connectivity, e-buses, and a sewage treatment plant. Old illegal buildings will be regularized, ensuring housing for all.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस