भिवंडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपीस अटक
By नितीन पंडित | Updated: March 21, 2023 19:27 IST2023-03-21T19:26:45+5:302023-03-21T19:27:05+5:30
भिवंडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपीस अटक करण्यात आली.

भिवंडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपीस अटक
भिवंडी : प्रतिबंधित गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या गांजा तस्कराला कोनगाव पोलिसांनी सापळा रचून सोमवारी अटक केली आहे. मोहम्मद हुसेन मुनव्वर शेख उर्फ अण्णा वय 36 वर्ष राहणार कोनगाव असे अटक करण्यात आलेल्या गांजा तस्कराचे नाव आहे. भिवंडीत अवैद्य गुटखा व गांजा विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी अवैद्य धंदे करणाऱ्या आरोपींच्या मुस्क्या आवळण्याचे निर्देश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते.
यानंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून कोनगाव पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक अभिजित पाटील व पोलीस हवालदार अरविंद गोरले यांना कोणगाव ब्रिज खाली एक इसम अवैध गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली असता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिप बने यांच्या मार्गदर्शनाखाली कोणगाव ब्रिज खाली सापळा लावला असता या ठिकाणी मोहम्मद हुसेन याच्याकडून १ किलो ५०० ग्राम वजनाचा ३० हजार रुपये किंमतीचा अवैध गांजा जप्त करत त्यास अटक केली आहे.