शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

ठाण्यात राजकीय आतिषबाजी,  भाजपाचा पालकमंत्र्यावर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 6:31 AM

ठाणे महापालिकेतील सत्ताधा-यांनी प्रशासनाशी मिलिभगत करून निविदांचा बाजार मांडल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केला आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेतील सत्ताधा-यांनी प्रशासनाशी मिलिभगत करून निविदांचा बाजार मांडल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केला आहे. निविदा छाननी समितीच्या माध्यमातून अपात्र ठेकेदारांना पात्र ठरविण्याचे उद्योग पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकारांची नगरविकास विभागाकडून चौकशी करण्याची मागणी भाजपा नगरसेवकांनी केली. या मागणीमुळे ठाणे पालिकेत निविदांच्या राजकारणावरून ऐनदिवाळीत शिवसेना-भाजपात फटाके फुटण्याची चिन्हे आहेत.सोमवारी सायंकाळी स्थानिक भाजपा नगरसेवकांच्या आग्रहाखातर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाणे महापालिकेस भेट घेऊन त्यांची गाºहाणी ऐकूण घेतली. त्यावेळी भाजपा नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदेवर हे घणाघाती आरोप केले. महापालिकेचा अर्थसंकल्प अंतिम झाला नसल्याने कामे होत नाहीत आणि तुलनेने भाजपा नगरसेवकांची कामे अजिबात मार्गी लावली जात नसल्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला. महासभेत शिवसेना विषयांवर चर्चा होऊ देत नाही व प्रशासनाचीदेखील विषयांवर चर्चा होऊ नये अशी इच्छा असल्याचे त्यांनी चव्हाण यांच्या निदर्शनास आणले.महापालिकेत सत्ताधारी आणि प्रशासनात मिलीभगत असल्याने हुकूमशाही पद्धतीने सभागृह चालविले जाते याकडेही नगरसेवकांनी लक्ष वेधले. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास महापालिका मुख्यालयातील भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांच्या दालनात ही बैठक पार पडली. नगरसेवक उपस्थित करीत असलेल्या प्रश्नांना उत्तरे मिळत नसल्याने कलम ५(२)(२) अन्वये विषय मंजूर केले जातात. नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शन उड्डाण पुलाच्या खाली जॉगिंग ट्रॅक तयार करण्याचे १ कोटी रु पेक्षा जास्तीचे काम असेच ५(२)(२) अन्वये दुसºया लेखाशीर्षातील तरतूद फिरवून मंजूर केले. केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठी ते काम केल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. आॅक्टोबर च्या महासभेतदेखील प्रकरण १०५३ व १०५४ बेघरांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यासाठी आरक्षण बदलच्या विषयांपैकी एक कारण न देता तहकूब केला तो केवळ मर्जीतल्या ठेकेदाराशी चर्चा अपूर्ण राहिल्याने असा स्पष्ट आरोप भाजपा सदस्यांनी यावेळी केला. मार्च २०१७ मध्ये आउट डोअर फिटनेस साहित्य व व्यायाम शाळेतील साहित्याची देण्यात आलेली देयके मोठ्याप्रमाणावर काम न करताच दिल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये २ कोटींपेक्षा जास्तीचा भ्रष्टाचार झाला असून त्याची नगरविकास विभागाकडून याची चौकशी करावी ही मागणीदेखील यावेळी केली. सीसीटीव्ही कॅमेरेदेखील फक्त शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात आहेत, रेप्टोकोस येथील सुविधा भूखंड नागरिकांचा विरोध असूनही भरवस्तीत आमदाराच्या दडपणाखाली प्रशासनाने स्मशानभूमीसाठी दिला. रस्ता रु ंदीकरणात बाधित झालेल्या निवासी व अनिवासी गाळेधारकांचे पुनर्वसन करण्याच्या कामात अनेक प्रकारे गैरव्यवहार झाल्याचे मुकेश मोकाशी यांनी लक्षात आणले.आयुक्तांनी दिले पारदर्शकतेचे आश्वासनराज्यमंत्री चव्हाण, आमदार संजय केळकर व सर्व नगरसेवक यांनी आयुक्तांची भेट घेऊन याबाबत त्त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली. या बैठकीत अनियमितता असलेल्या ठरावांची अंमलबजावणी करतेवेळी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाईल. निविदा प्रकरणी असलेल्या अटी शर्ती मध्ये जास्तीत जास्त स्पर्धा होण्यासाठी बदल केले जातील तसेच निविदा छाननी समिती आणि निविदा कमिटी याविषयी पण विचार केला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच भाजपच्या नगरसेवकांनी मागणी केलेली प्रमुख कामे नोव्हेंबरपर्यंत अर्थसंकल्प तरतुदीसहीत निश्चित मार्गी लावण्यात येतील असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.कोणत्याही प्रकारे चर्चा न करता मंजूर केलेल्या विषयांची चौकशी केली जावी व तोपर्यंत या विषयांना स्थगिती देण्याची विनंती मुकेश मोकाशी यांनी आयुक्तांकडे केली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका