शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांना हवे आहेत आणखी साडेपाच हजार तरुण पोलिस; पोलिस महासंचालकांकडे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 06:53 IST

पोलिस महासंचालकांकडे प्रस्ताव: शासनाकडून मंजुरीची प्रतीक्षा

- जितेंद्र कालेकरठाणे : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील व्हीआयपी बंदोबस्त, गुन्ह्यांचा निपटारा करताना ठाणे शहर पोलिसांची दमछाक होत असल्याने ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील ३५ पोलिस ठाण्यांसाठी ५० टक्के वाढीव म्हणजे पाच हजार ४९७ इतक्या अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी पोलिस महासंचालकांकडे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर सहा नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव दिला आहे. हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ठाणे पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.

पूर्वीच्या ठाणे ग्रामीणमधून ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाची १९८१ मध्ये निर्मिती झाली. त्यावेळी जेमतेम चार ते पाच हजारांचे संख्याबळ आयुक्तालयाच्या पोलिसांचे होते. त्यावेळी आयुक्तपदही विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचे होते. ठाणे आयुक्तालयाने सुमारे साडेपाच हजार इतक्या अतिरिक्त मनुष्यबळाचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयात ऑगस्ट २०२३ मध्ये पाठविला आहे. यातील दोन हजार १४१ कर्मचारी हे ३५ पोलिस ठाण्यांसाठी दिले जातील. 

अशी आहे ठाण्यातील सध्याची स्थितीआता आयुक्तपद पोलिस महासंचालक दर्जाचे झाले. त्याशिवाय, सहआयुक्तांसह चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, ११ उपायुक्त, ३० सहायक आयुक्त, १८२ निरीक्षक  आणि २३९ सहायक पोलिस निरीक्षक असे ९२५ अधिकारी तसेच सुमारे नऊ हजार कर्मचारी असे दहा हजार ६६ पोलिसांचे संख्याबळ आयुक्तालयात तूर्त आहे. हे सर्व ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या  पाच परिमंडळातील ३५ पोलिस ठाण्यासह गुन्हे अन्वेषण, विशेष शाखा आणि वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. आता ही संख्या रोजचा बंदोबस्त, कायदा सुव्यवस्था, गुन्ह्यांचा शोध आणि वाहतूक नियंत्रणासाठी अत्यंत तोकडी पडत आहे. वाहतूक विभागासाठी तर ८०० कर्मचाऱ्यांची गरज आहे.

पोलिस ठाण्यांची संख्या ४१ होणार

वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि गुन्हेगारी त्याचबरोबर भौगोलिक परिस्थिती गुन्हेगारी नियंत्रण, कायदा सुव्यवस्था तसेच रस्ते अपघात अशा सर्वच अनुषंगाने विचार केल्यास ठाणे आयुक्तालयात आणखी सहा पोलिस ठाण्यांची गरज आहे. संवेदनशील मुंब्रा पोलिस ठाण्याचे विभाजन करुन नवीन दिवा, भिवंडीतील नारपोलीमधून दापोडे, शांतीनगरचे विभाजन करुन वंजारपट्टी तसेच शांतीनगर आणि नारपोली या दोन पोलिस ठाण्यांमधून मानसरोवर तर कल्याणच्या मानपाडा पोलिस ठाण्याच्या विभाजनातून काटई आणि उल्हासनगरच्या हिललाईनमधून नेवाळी या सहा पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. या सहा पोलिस ठाण्यांसाठी ६६४ इतक्या वाढीव कर्मचाऱ्यांचीही  गरज लागणार आहे. या पोलिस ठाण्यांच्या जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही प्रस्ताव दिला आहे. शासन मंजुरी मिळाल्यानंतर पोलिस ठाण्यांची संख्याही ३५ वरून ४१ होणार आहे. 

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे