ठाण्याची कुस्ती स्पर्धा सांगलीच्या मारुती जाधव यांनी जिंकली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 00:47 IST2020-01-20T00:47:02+5:302020-01-20T00:47:22+5:30

'महापौर चषक कुस्ती स्पर्धा' सांगलीच्या मारुती जाधव यांनी पटकावली.

Thane wrestling competition was won by Maruti Jadhav of Sangli | ठाण्याची कुस्ती स्पर्धा सांगलीच्या मारुती जाधव यांनी जिंकली 

ठाण्याची कुस्ती स्पर्धा सांगलीच्या मारुती जाधव यांनी जिंकली 

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या वतीने व ठाणे जिल्हा कुस्तीगर संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित 'महापौर चषक कुस्ती स्पर्धा' सांगलीच्या मारुती जाधव यांनी पटकावली. जाधव यांना मानाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात आली. याप्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के,उपमहापौर पल्लवी कदम, आयुक्त संजीव जयस्वाल, सभागृह नेते अशोक वैती आदी उपस्थित होते. रविवारी ही स्पर्धा ठाण्याच्या आर्य क्रीडा मंडळ, महागिरी कोळीवाडा येथे झाली.

Web Title: Thane wrestling competition was won by Maruti Jadhav of Sangli