शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

ठाणे : अमेरिकन डॉलर चोरणारा जेरबंद; एक दिवसाची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:34 AM

तीन मोबाइलसह ५०० अमेरिकन डॉलर असा सुमारे ६६ हजारांचा ऐवज चोरणाºया हिमांशू घोसाळकर (१९, दोस्ती एमएमआरडी, ठाणे) याला सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली.

ठाणे : तीन मोबाइलसह ५०० अमेरिकन डॉलर असा सुमारे ६६ हजारांचा ऐवज चोरणाºया हिमांशू घोसाळकर (१९, दोस्ती एमएमआरडी, ठाणे) याला सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत.वर्तकनगरच्या ‘दोस्ती कॉम्पलेक्स’ या इमारतीच्या १६ व्या मजल्यावर राहणाºया नंदा रामा राव (५८) या २० फेब्रुवारीला मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास दुबई येथून ठाण्यातील घरी परतल्या. त्या घरी आल्यानंतर घराच्या बाहेर असलेल्या बूट स्टँडवर त्यांनी आपली पर्स ठेवून दरवाजा उघडला. याच पर्समध्ये १८ हजारांची रोकड, ५०० अमेरिकन डॉलर (३२ हजार ४०० रुपयांचे भारतीय चलन), तीन मोबाइल असा ६६ हजार ४०० रुपयांचा ऐवजही होता. घाईगडबडीत त्यांच्याकडून हा सर्व ऐवज असलेली पर्स घराबाहेरच राहिली. सकाळी ७ वाजता जाग आल्यानंतर त्यांनी फोन करण्यासाठी मोबाइलची शोधा शोध केली. तेंव्हा त्यांना त्यांचा एकही मोबाईल आणि पर्स मिळाली नाही. त्याचवेळी पर्स घराबाहेर विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु, घराबाहेरही शोधाशोध केल्यानंतरही त्यांना ती न मिळाल्याने त्यांनी अखेर याप्रकरणी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्रेहल अडसुळे, हवालदार विनायक आंबेकर आणि कॉन्स्टेबल महेश राऊत यांच्या पथकाने नंदा यांच्या इमारतीमध्ये २० फेब्रुवारी रोजी पहाटे २ ते सकाळी ७ या दरम्यान कोण कोण आले? याची तपासणी केली. त्यावेळी पेपर विक्रेता हिमांशू यांच्यासह अन्य काही जण आल्याचे सीसीटीव्हीचे फुटेजही मिळाले. त्यात हिमांशूच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्याची खास शैलीत या पथकाने चौकशी केली. याच चौकशीत त्याने या चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून तीन मोबाइल आणि एक कॅमेरा हस्तगत केला असून रोकड मात्र त्याने दिली नाही.

टॅग्स :Crimeगुन्हाThiefचोरthaneठाणे