Thane: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून दोघांचे पलायन, वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Updated: March 11, 2024 18:57 IST2024-03-11T18:57:36+5:302024-03-11T18:57:53+5:30
Thane News: लोकमान्यनगर भागातील रहिवाशी पूजा बाणावलीकर (५३) या महिलेच्या गळयातील ४२ हजारांचे १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोघांनी मोटारसायकलीवरुन पलायन केल्याची घटना निदर्शनास आली आहे.

Thane: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून दोघांचे पलायन, वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा
- जितेंद्र कालेकर
ठाणे - लोकमान्यनगर भागातील रहिवाशी पूजा बाणावलीकर (५३) या महिलेच्या गळयातील ४२ हजारांचे १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोघांनी मोटारसायकलीवरुन पलायन केल्याची घटना निदर्शनास आली आहे. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी दिली.
पूजा या १० मार्च २०२४ रोजी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास लोकमान्यनगर बस डेपोसमोरील रस्त्यावरुन त्यांच्या पतीसमवेत उभ्या होत्या. त्याच दरम्यान एका मोटारसायकलीवरुन डबलसीट आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने त्यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून दूचाकीवरुन पलायन केले. याप्रकरणी पूजा यांनी वर्तकनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.