ठाण्यात पैशांच्या देवाण घेवाणीतून एकावर दोघांनी केला चाकूने खूनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 23:28 IST2021-06-23T23:25:00+5:302021-06-23T23:28:48+5:30

ठाण्यातील राबोडी परिसरातील रहिवाशी दिनेश पांचाळ (३२, रा. आनंद पार्क, ठाणे) यांच्यावर लोखंडी रॉड आणि चॉपरने खूनी हल्ला करणाऱ्या इतेश धेंडे (२३, रा. वारली पाडा, श्रीनगर, ठाणे ) आणि हितेश औसारे (२१, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना राबोडी पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली.

In Thane, two men attacked a knife while exchanging money | ठाण्यात पैशांच्या देवाण घेवाणीतून एकावर दोघांनी केला चाकूने खूनी हल्ला

दोघांना अटक

ठळक मुद्दे दोघांना अटकराबोडी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील राबोडी परिसरातील रहिवाशी दिनेश पांचाळ (३२, रा. आनंद पार्क, ठाणे) यांच्यावर लोखंडी रॉड आणि चॉपरने खूनी हल्ला करणाऱ्या इतेश धेंडे (२३, रा. वारली पाडा, श्रीनगर, ठाणे ) आणि हितेश औसारे (२१, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना राबोडी पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली. पैशांच्या वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यातील आनंदपार्क परिसरात वास्तव्याला असलेल्या दिनेश याच्या डोक्यावर आणि डाव्या हातावर इतेश आणि हितेश या दोघांनी पैशांच्या वादातून लोखंडी रॉड आणि चॉपरने २३ जून रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास खूनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोघेही पसार झाले होते. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात दिनेश यांचे मित्र पराग परब यांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. याची गांभीर्याने दखल घेत परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक पी. बी. भालेराव, सहायक पोलीस निरीक्षक एम. ए. कांबळे आणि उपनिरीक्षक महेश जाधव यांच्या पथकाने इतेश आणि हितेश या दोघांनाही राबोडी परिसरातून बुधवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अटक केली.या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक बी. एस. चव्हाण हे करीत आहेत.
.......................

Web Title: In Thane, two men attacked a knife while exchanging money