ठाण्यात रिक्षावर झाड पडून रिक्षाचालक जखमी तर रिक्षाचा झाला चेंदामेंदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 15:12 IST2021-02-25T15:10:01+5:302021-02-25T15:12:48+5:30
A tree fell down on a rickshaw : ठाण्याच्या नौपाडा दमानी इस्टेट परिसरातील दत्तमंदिर येथे रिक्षा रांगेत उभ्या होत्या.

ठाण्यात रिक्षावर झाड पडून रिक्षाचालक जखमी तर रिक्षाचा झाला चेंदामेंदा
ठाणे: रिक्षावर झाड पडल्याची घटना गुरुवारी दुपारी ठाण्यातील नौपाडा दमानी इस्टेट येथे घडली. यामध्ये रिक्षाचे नुकसान झाले असून रस्त्याच्या कडेला उभा असलेला जयराम यादव हा दुसऱ्याच रिक्षाचा चालक जखमी झाला आहे.
ठाण्याच्या नौपाडा दमानी इस्टेट परिसरातील दत्तमंदिर येथे रिक्षा रांगेत उभ्या होत्या. त्यातच गुरुवारी दुपारी त्या परिसरातील रस्त्यालगत असलेला सुकलेले झाड अचानक पडले. पडलेला झाडाखाली बरोबर तेथे उभ्या असलेल्या रिक्षांपैकी राजेंद्र तिवारी यांचा रिक्षावर तो झाड पडल्याने त्या रिक्षाचे नुकसान झाले आहे. त्यातच रिक्षा सोडून उभा असलेला नवी मुंबईतील रिक्षाचालक जयराम यादव (३५) हा देखील त्यामध्ये जखमी झाला असून त्याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याने त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. घटनेची माहिती कळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली. यावेळी १ फायर वाहन आणि १ रेस्क्यू वाहन पाचारण केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.