ठाण्यात स्लॅबच्या प्लास्टरचा भाग पडून तीन मुली किरकोळ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 22:45 IST2021-12-31T22:37:06+5:302021-12-31T22:45:54+5:30
ठाण्याच्या लोकमान्य नगरमधील घटना

ठाण्यात स्लॅबच्या प्लास्टरचा भाग पडून तीन मुली किरकोळ जखमी
ठाणे : येथील लोकमान्यनगर पाडा नंबर दोन येथील गणेश कृपा सोसायटी नंबर दोन मधील चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या शंकर महाजन यांच्या घरातील (सिलिंग) स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग कोसळूनन तीन लहान मुली किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. त्यामध्ये महाजन यांच्या मुलीसह त्यांच्याकडे पाहुण्या आलेल्या दोन भाच्यांचाही समावेश आहे.
या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या तिघीही ९ आणि १० वयोगटातील आहेत. मानसी जाधव (१०) हिच्या उजव्या पायाला तर आस्था गोडसे (१०) हिच्या पाठीवर आणि तनिष्का महाजन (९) हिच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना घडली तेंव्हा त्या तिघी घरात बसल्या होत्या.या घटनेची माहिती कळताच,ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेतली. स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग खाली पडला आणि तडा गेला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.