शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

ठाण्याचा पारा चढला! ४१.६ अंशवर तापमान, वाढत्या उष्णतेने अंगाची लाहीलाही

By अजित मांडके | Updated: April 15, 2024 16:07 IST

प्रादेशिक हवामान विभागाने रविवारी पुढील पाच दिवसांसाठी तापमानाचा अंदाज जारी केला.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याची अनुभूती ठाण्यात सोमवारपासूनच जाणवू लागली. सोमवारी ठाणे शहरातील तापमानात वाढ होवून पारा ४१.६ अंश सेल्सियसवर पोहोचला होता. वाढलेल्या तापमानामुळे ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होवू लागली होती. तसेच पुढील काही दिवस उष्णतेचा पारा वाढणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने रविवारी पुढील पाच दिवसांसाठी तापमानाचा अंदाज जारी केला. कोकण विभागात सोमवार ते बुधवार या कालावधीत कमाल तापमानाचा पारा ३ ते ४ अंशांनी वाढून, उष्णता निर्देशांक ४० ते ५० अंशांदरम्यान जाणवू शकेल, असेही स्पष्ट केले. आर्द्रता आणि उष्णता यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा तापमानाची जाणीव अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोमवारी सकाळी ११ नंतर वातावरणात उष्णता वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यात हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाची अनुभूती सोमवारी ठाणेकरांना आली.  ठाणे शहरातील तापमान ४१.६ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. या वाढलेल्या तापमानामुळे ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होवू लागली होती. रस्त्यावरून पायी चालणाऱ्या नागरिकांनी डोक्यात टोपी, तर, काहींनी छत्री घेवून बाहेर पडण्याच्या निर्णय घेतला. तर, अनेकांनी थंड पेयच्या गाड्यांवर आपला मोर्चा वळविला असल्याचे दिसून आले.

दरम्यान, या वाढत्या तापमानाने ठाणेकर नागरिकांनी घर आणि ऑफिस मधील एसीत बसून थंडगार हवेत राहणाने जास्त पसंत केले. वातवरणातील वाढत्या उन्हाच्या काहीलीमुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

उन्हापासून बचावासाठी काय काळजी घ्याल?

१. पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव्य पदार्थ घ्या.२. शक्यतो तीव्र उन्हात दुपारी १२ ते ४ या वेळात घरात राहावे.३. सैलसर व सुती कपडे वापर करणे, शक्यतो पांढरे कपडे वापरावेत.  ४. डोक्यावर टोपी रुमाल किंवा छत्री वापरावी.५. थेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला उन्हाला अडवावे व वातावरण थंड राहिल यासाठी पंख्याचा वापर करण्यात यावा.६. गर्भवती स्त्रिया, वैद्यकीय समस्या असणाऱ्या कामगारांनी उन्हात काम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :thaneठाणे