Thane: कामगार हॉस्पिटलचा स्लॅबचा भाग कोसळला; एक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 15:07 IST2022-07-06T15:07:12+5:302022-07-06T15:07:49+5:30
Thane News: वागळे इस्टेट येथील कामगार हॉस्पिटलच्या तिसऱ्या माळ्यावरील टेरेस च्या सुरक्षारक्षक भिंतीचा स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास घडली.

Thane: कामगार हॉस्पिटलचा स्लॅबचा भाग कोसळला; एक जण जखमी
ठाणे - वागळे इस्टेट येथील कामगार हॉस्पिटलच्या तिसऱ्या माळ्यावरील टेरेस च्या सुरक्षारक्षक भिंतीचा स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास घडली. या घटनेत ७३ वर्षीय विमल शेट्ये या किरकोळ जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
ठण्यातील कामगार हॉस्पिटलचा स्लॅब पडल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व ठाणे महानगपालिकेचे सहाय्यक आयुक्त लोकमान्य सावरकर प्रभाग समिती आणि सहाय्यक आयुक्त वागळे इस्टेट प्रभाग समिती आणि अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांनी धाव घेतली. कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी विमल शेट्ये या आजीबाईंचा हनुवटीवर किरकोळ मार लागल्याने त्या जखमी झाली आहे. तसेच सुरक्षारक्षक भिंतीचा स्लॅबचा भाग कोसळला असून उर्वरित भाग हा धोकादायक स्थितीत आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.