Thane: भिवंडीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; दोघांवर गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Updated: May 13, 2024 18:42 IST2024-05-13T18:42:34+5:302024-05-13T18:42:58+5:30
Bhiwandi News: भिवंडी शहरात एका वीस वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत बलात्कार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या नराधमा विरोधात रविवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane: भिवंडीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; दोघांवर गुन्हा दाखल
- नितीन पंडित
भिवंडी: शहरात एका वीस वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत बलात्कार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या नराधमा विरोधात रविवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या वीस वर्षीय युवतीला मुंबई येथे राहणाऱ्या इसमाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करून तिला गर्भवती केले व त्यानंतर तिचा गर्भपात घडवून आणला.या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून हसाम इसरार हास्मी व त्याचे वडील इसरार हास्मी या दोघां विरोधात भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.