शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ठाणे स्थानकात चोरटे सुसाट : लोकलमधील मोबाइलचोरीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 2:42 AM

ठाणे स्थानकात चोरटे सुसाट : वर्षभरात अवघे २४६ गुन्हे उघडकीस, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची होते मदत

ठाणे : लोकल प्रवासात मोबाइलचोरट्यांची जणू बुलेट ट्रेन सुसाटच असल्याचे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. २०१७ पेक्षा २०१८ या वर्षभरात लोकलमध्ये चोरीला गेलेल्या मोबाइलचे प्रमाण एक हजार २९ ने वाढले असून उघडकीचे प्रमाण जवळपास ४३ ने घटले आहे. मात्र, गतवर्षापेक्षा या वर्षात पकडलेल्या आरोपींची संख्या सुमारे १२५ ने वाढली असून ही जमेची बाजू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसागणित लोकल प्रवासात मोबाइलचोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी पेट्रोलिंगवर विशेष भर देऊन चोरट्यांवर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी चोरट्यांची टॉप २५ ची यादी अद्ययावत केली. तसेच स्थानकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांचाही उपयोग होऊ लागल्याने चोरट्यांच्या चोरी करण्याच्या काही पद्धती समोर आल्या. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणखी सोपे झाले होते. परंतु, त्यांनी चोरीच्या प्रकारात बदल केल्याने पुन्हा मोबाइलचे चोरीचे गुन्हे वाढले आहे.हे प्रकार सर्वाधिक ठाणे रेल्वेस्थानकात वाढल्याचे दिसत आहे. त्यापाठोपाठ मुंब्रा, दिवा आणि कळवा या रेल्वेस्थानकांत मोबाइलचोरीचे प्रकार वाढले आहेत. या घटनांनुसार, दरदिवसाला मोबाइलचोरीचे लोहमार्ग पोलीस ठाण्यात चार ते पाच गुन्हे नोंदवले जात आहेत. याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.चोरटे परराज्यातील तर काही अल्पवयीनपोलीस कारवाईनंतर तपासात चोरटे अल्पवयीन असल्याचे बºयाच वेळा समोर आले. काही चोरटे कर्नाटक आणि पश्चिम बंगाल यासारख्या परराज्यांतून येऊन फोन चोरी करून तत्काळ पोबारा करत होते. तसेच चोरीला जाणाºया मोबाइलचे लोकेशन्स पाहिल्यास कर्नाटक आणि पश्चिम बंगाल असे आढळत होते. मात्र, दुसºयांदा त्यांचे लोकेशन्स दिसत नव्हते. त्यातच एक किंवा दोन मोबाइल आणण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस फौज पाठवणेही शक्य नसल्याने हे चोरटे पकडणे पोलिसांसाठी डोकेदुखी होऊन बसले आहेत.२०१८ मध्ये ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात एकूण चार हजार ७९६ गुन्हे नोंदवले गेले आहे. तर, ४९४ इतके गुन्हे उघडकीस आले असून एकूण ५७७ आरोपींना बेड्या घालण्यात यश आले आहे. या एकूण गुन्ह्यांमध्ये मोबाइलचोरीचे चार हजार ३१ गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यापैकी अवघे २४६ गुन्हेच पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. तर, चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी पाच टक्के मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.एकूण गुन्ह्यांचे प्रमाण जरी वाढले असले, तरी त्यामध्ये मोबाइलचे गुन्हे नोंदवण्यास सुरुवात झाल्यापासून वाढले आहे. त्यामध्ये तीन ते चार टक्के प्रमाण हे सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचे आहे, अशी माहिती एक वरिष्ठ अधिकाºयाने दिली.एकूण नोंदवलेल्यागुन्ह्यांचा तक्तावर्ष गुन्हे उघड आरोपी२०१७ ३४६० ३९२ ४५३२०१८ ४७९६ ४९४ ५७७एकूणमोबाइलच्यागुन्ह्यांचा तक्तावर्ष गुन्हे उघड२०१७ ३००२ २८९२०१८ ४०३१ २४६ 

टॅग्स :MobileमोबाइलThiefचोरthaneठाणे