सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाणे पोलिसांनी शोधले वृद्धेचे नातेवाईक: आई मुलाची झाली पुनर्भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 20:12 IST2019-06-13T20:02:03+5:302019-06-13T20:12:37+5:30

एका रिक्षा चालकाने आणलेल्या अनोळखी ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या मुलाची भेट राबोडी पोलिसांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून घडवून आणल्याची घटना गुरुवारी घडली. पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडलेल्या या कर्तव्याबद्दल मुलानेही समाधान व्यक्त केले.

Thane police searched through social media, relatives of elderly: mother resumes to mother | सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाणे पोलिसांनी शोधले वृद्धेचे नातेवाईक: आई मुलाची झाली पुनर्भेट

शहापूर येथून झाली होती बेपत्ता

ठळक मुद्देशहापूर येथून झाली होती बेपत्ताअवघ्या २४ तासात झाली मुलाची भेटराबोडी पोलिसांनी घेतले परिश्रम

ठाणे: सोशल मिडियाच्या प्रभावी वापरातून एका ७० वर्षीय वृद्धेला तिचे नातेवाईक मिळवून देण्यात राबोडी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या एका मेसेजमुळे रवींद्र भोईर (४५) या शहापूरच्या रहिवाशाला त्याची ७० वर्षीय वनिता भोईर ही आई अवघ्या २४ तासांमध्ये पुन्हा मिळाली. गुरुवारी राबोडी पोलिसांनी या हरविलेल्या या आईला सुखरुपपणे तिच्या मुलाच्या स्वाधीन केले.
स्मृतीभ्रंश झाल्यामुळे शहापूर येथे रवींद्र ्र भोईर या मोठया मुलाकडे राहणारी वनिता ही वृद्ध महिला १२ जून रोजी भिवंडीतील कशेळी येथे आली होती. तिथे एका रिक्षा चालकाने तिला कापूरबावडी परिसरात सोडले होते. परंतू, तिला पत्ता आणि कसलीच माहिती देता येत नसल्यामुळे त्याने तिला राबोडी पोलीस ठाण्यात रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आणून सोडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सूर्यवंशी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तिचा फोटो व्हॉटसअ‍ॅपच्या ठाण्यातील अनेक गृपवर वितरित केला. ही माहिती या महिलेचा मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरीवर असलेल्या रवींद्र या मुलाला मिळाली. त्याने गुरुवारी दुपारी ४ वा. च्या सुमारास राबोडी पोलिसांशी संपर्क साधला. त्याने सर्व ओळख पटवून दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी तिला या मुलाच्या स्वाधीन केले.
मुलाकडून पैशांसाठी त्रास
मोठा मुलगा रवींद्र याच्याकडे ही महिला वास्तव्याला असली तरी तिचा धाकटा मुलगा तिला पैशांसाठी दमदाटीही करतो, असेही तपासात समोर आले. स्मृतीभ्रंश आणि मानसिक रुग्ण असल्यामुळे ही महिला यापूर्वीही गुजरातमध्ये निघून गेली होती, असेही रवींद्रने पोलिसांना सांगितले.

Web Title: Thane police searched through social media, relatives of elderly: mother resumes to mother