शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

तोंडाला मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध ठाणे पोलीस करणार कारवाई

By जितेंद्र कालेकर | Published: April 09, 2020 12:15 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी संचारबंदीच्या काळात आधी विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले होते. यापुढे तोंडाला मास्क नसणा-यांवरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांनी काढले आदेशठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या परिमंडळांमध्ये होणार गुन्हे दाखल मास्क न घातल्यामुळे अगदी न्यायालयीन कोठडीही मिळू शकते

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबई महानगरपालिकेपाठोपाठ आता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातही तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बुधवारी काढले आहेत. या आदेशाचे पालन न करणा-यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे.पोलीस आयुक्त फणसळकर यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, राज्यभरात १३ मार्च २०२० पासून साथरोग अधिनियम १८९७ ची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कोरोनावर नियंत्रण आणि प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० नुसार नियमावली तयार केली आहे. मास्क परिधान केल्याने कोरोना विषाणूचा प्रसार कमी होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक अंतर राखण्याच्या उपायांबरोबरच परस्परांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींच्या बाबतीत मास्क परिधान करणेही महत्वपूर्ण आहे. त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या व्यक्तींनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. त्यामुळे ८ एप्रिल २०२० पासून कोणत्याही कारणास्तव रस्ता, रुग्णालय, कार्यालय आणि बाजारपेठ आदी ठिकाणी जाणा-यांनी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. वैयक्तिक किंवा शासकीय वाहनातून प्रवास करणा-यांसाठीही हाच नियम लागू राहणार आहे. कार्यालयांमध्ये काम करतांना तसेच कोणत्याही बैठकीच्या वेळी एखाद्या जमावामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक केले आहे. हे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये लागू राहणार आहेत.* कोणत्याही केमिस्टकडे उपलब्ध असलेले सुधारित किंवा घरी बनविलेले (धुण्यायोग्य असे) मास्क धुतल्यानंतर निर्जंतूकीकरण करुन पुन्हा वापरता येऊ शकणारे मास्कही वापरता येतील. या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई झालेल्या आरोपीला शिक्षेचीही तरतूद आहे.

* काय होणार कारवाईएखाद्याने बाहेर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरुन जातांना तोंडाला मास्क लावलेला नसल्याचे आढळल्यास त्याला सुरुवातीला भादंवि कलम १८८ नुसार नोटीस बजावली जाणार आहे. त्याला पोलीस ताब्यात घेऊ शकतात. त्यानंतर न्यायालयातून त्याला जामीन घ्यावा लागेल. जर जामीन मिळाला नाहीतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यास थेट कारागृहातही जाण्याची वेळ संबंधितांवर बेतू शकते, असेही एका पोलीस अधिका-याने सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस