शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

ठाणे-पालघरच्या १४ स्थानिक स्वराज्य संस्था मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:44 PM

चौदाव्या वित्त आयोगाचा निधी : १७४ कोटी ५१ लाख वितरित

नारायण जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : केंद्राकडून १४ व्या वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा १४८९ कोटी ५१ लाखांचा पहिला हप्ता राज्य सरकारने राज्यातील ३८२ स्थानिक संस्थांना वितरीत केला असून यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाट्याला १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७० रुपये आले आहेत.या निधीतून स्थानिक स्वराज्य संस्थांना मूलभूत पायाभूत सुविधांची कामे करता येणार आहेत. त्यात्या शहरांची लोकसंख्या,भौगोलिक क्षेत्रफळ या निकषांच्या आधारे हे अनुदान वितरीत होते. या १४ स्वराज्य संस्थांमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील ड वर्ग महापालिकांसह नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा समावेश आहे.ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, भिवंडी या तीन महापालिकांसह अंबरनाथ व बदलापूर नगर परिषद आणि मुरबाड आणि शहापूर नगरपंचायती तर, पालघर जिल्ह्यातील जव्हार, डहाणू, पालघर नगर परिषदांसह विक्रमगड, तलासरी, वाडा, मोखाडा या नगरपंचायतींना हे १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७० रुपये अनुदान मिळणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव अनुदानाची रक्कमउल्हासनगर महापालिका ३१ कोटी ९८ लाख ११ हजार ९६९भिवंडी महापालिका ४५ कोटी ५९ हजार ७६३मीरा-भार्इंदर महापालिका ५२ कोटी २९ लाख ९६ हजार ३५०बदलापूर नगर परिषद ११ कोटी ६३ लाख ११ हजार ४५८अंबरनाथ नगर परिषद १६ कोटी ६३ लाख ७३ हजार ३९६शहापूर नगरपंचायत ८४ लाख ९८ हजार ५२२मुरबाड नगरपंचायत एक कोटी ५० लाख ८२ हजार २१३जव्हार नगर परिषद ८२ लाख ४० हजार २७३डहाणू नगर परिषद तीन कोटी ५१ लाख पाच हजार ३९३पालघर नगर परिषद पाच कोटी ५८ लाख सात हजार १०१विक्रमगड नगरपंचायत ७५ लाख ९० हजार ६६तलासरी नगरपंचायत एक कोटी ५७ लाख ८३ हजार ६२वाडा नगरपंचायत एक कोटी २६ लाख ३७ हजार ५७२मोखाडा नगरपंचायत एक कोटी सात लाख ७८ हजार ३२एकूण १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७०