उल्हासनगरातील प्रसिद्ध कालीमाता मंदिरात देवीच्या दागिन्यांची चोरी, नेपाळी वॉचमन फरार
By सदानंद नाईक | Updated: May 25, 2024 22:37 IST2024-05-25T22:36:32+5:302024-05-25T22:37:31+5:30
Thane News: कॅम्प नं-४ येथील प्रसिद्ध कालीमाता मंदिरातील देवीच्या दागिन्यांची चोरी ४ दिवसांपूर्वी ठेवलेल्या वाचमनने एका साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघड झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांचे दोन पथके तैनात करण्यात आले आहे.

उल्हासनगरातील प्रसिद्ध कालीमाता मंदिरात देवीच्या दागिन्यांची चोरी, नेपाळी वॉचमन फरार
- सदानंद नाईक
उल्हासनगर - कॅम्प नं-४ येथील प्रसिद्ध कालीमाता मंदिरातील देवीच्या दागिन्यांची चोरी ४ दिवसांपूर्वी ठेवलेल्या वाचमनने एका साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघड झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांचे दोन पथके तैनात करण्यात आले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील ७० वर्ष जुन्या कालीमाता मंदिरात जुना वॉचमन काम सोडून गेल्यावर, मंदिर व्यवस्थापनाने ४ दिवसांपूर्वी रमेश रावल उर्फ थापा याला वॉचमन म्हणून कामाला ठेवले होते. शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या दरम्यान थापा याने एका साथीदारांच्या मदतीने मंदिराचे लोखंडी दरवाजे तोडून गर्भगृहात प्रवेश करून करीत १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरले. तसेच मंदिर व्यवस्थपणाचे पैसे चोरण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जात असतांना मंदिर पुजाऱ्याना आवाजाने जाग आली. झोपण्याच्या खोली बाहेर पुजारी आले असता त्यांना वॉचमन थापा एका साथीदारांसह पळत असल्याचे दिसले. त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या जवळ धारदार शस्त्र असल्याने ते पळून जाण्यात यशस्वी झाले.
मंदिरात झालेला प्रकार पुजाऱ्यानी मंदिर व्यवस्थापनाचे सरचिटणीस सुरजित बर्मन यांच्यासह अन्य जणांना सांगितला. त्यांनी मंदिरात धाव घेऊन विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मंदीर येऊन चौकशी केली असता वॉचमन रमेश रावल उर्फ थापा याने मंदिरातील देवीच्या दागिन्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे व डिव्हीआर चोरून नेल्याचे उघड झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपासासाठी दोन पथके तयार केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत.