Thane: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

By जितेंद्र कालेकर | Updated: February 17, 2023 16:39 IST2023-02-17T16:38:25+5:302023-02-17T16:39:07+5:30

Thane: पालिका अधिकारी महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी चे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाने अटक पूर्व जामीन शुक्रवारी मंजूर केला आहे.

Thane: NCP leader Jitendra Awad granted anticipatory bail | Thane: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Thane: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

ठाणे - पालिका अधिकारी महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी चे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाने अटक पूर्व जामीन शुक्रवारी मंजूर केला आहे.याप्रकरणी आव्हाड यांच्यासह सात जणाविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
शुक्रवारी सकाळी आव्हाड यांच्या वकिलांनी अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.  त्या नंतर काही अटी शर्थीवर आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. 

मारहाण प्रकरणी चौघाच्या पोलिस कोठडीत वाढ : दिलासा नाही
महेश आहेर यांना केलेल्या मारहाण प्रकरणात ठाणे न्यायालयाने 20 फेब्रुवारी पर्यंत हेमंत वाणी यांच्यासह चौघानाही पोलीस कोठडी दिली आहे. आरोपी पैकी एक अभिजीत पवार यांच्या कडे असलेले शस्त्र ( बंदूक ) पोलिसांनी हस्तगत न केल्याने पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

Web Title: Thane: NCP leader Jitendra Awad granted anticipatory bail