शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
3
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
4
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
5
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
6
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
7
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
8
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
9
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
10
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
11
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
12
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
13
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
14
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
15
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
16
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
17
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
18
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
19
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
20
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
Daily Top 2Weekly Top 5

TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:09 IST

Thane Municipal Election Exit Poll Result 2026: महापालिका निवडणुकींसाठी मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर येण्यास सुरूवात झाली आहे. ठाणे महापालिकेत शिंदेसेनेना मुसंडी मारणार असल्याचा कौल आहे. 

Thane Municipal Election 2026 Exit Poll Results: मुंबईनंतर ठाण्यात भाजपा आणि शिंदेसेना एकत्र लढत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वर्चस्व असलेल्या या महापालिकेचा निकाल काय लागणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये ठाणे शिंदेंचेच असल्याचे सिद्ध होणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारणार असल्याचे अंदाज एक्झिट पोलच्या कौलने दिला आहे.   

'साम टीव्ही'चा एक्झिट पोल समोर आला आहे. ठाणे महापालिकेत शिंदेसेना आणि भाजपा युतीमध्ये लढत आहेत. उद्धवसेना आणि मनसे यांचीही युती आहे. त्यामुळे या महापालिकेची सत्ता कोण, राखणार आणि कोण सर्वात मोठा पक्ष ठरणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहेत. ठाणे महापालिकेबद्दलचा पहिला एक्झिट पोल समोर आला असून, त्यात शिंदेसेना ७२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा कौल देण्यात आला आहे. पाहा, या सर्व महानगरपालिका निवडणुकांचे एक्झिट पोल Live

भाजपाला किती जागा मिळणार?

ठाणे महापालिकेमध्ये भाजपाला २६ जागा, तर शिंदेसेनेला ७२ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला १० जागा, तर काँग्रेसला ३ जागा, उद्धवसेनेला ३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १५ जागा, मनसेला २ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

२०१७ मध्ये कोणत्या पक्षाने किती जागा जिंकलेल्या?

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदा महापालिका निवडणूक होत आहे. २०१७ मध्ये जेव्हा शिवसेना एकत्र होती, तेव्हा शिवसेनेला ६७ जागा मिळाल्या होत्या. भाजपाने २३ जागा त्यावेळच्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. 

राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे महापालिका निवडणुकीत ३४ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले होते, तर काँग्रेसला ३ जागाच जिंकता आल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे एआयएमआयएमला दोन जागा जिंकण्यात यश आले होते. 

शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ठाणे महापालिकेची निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना एकत्र आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठं आव्हान नाहीये. उद्धवसेना आणि मनसे एकत्र असले, तरी पाहिजे तितके आव्हान निर्माण करू शकले नाही, असे चित्र प्रचारादरम्यान दिसले. त्यामुळे युतीतील दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक सोपी जाईल, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात आणि अभ्यासकांमध्ये आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Thane Exit Poll: Shinde Sena likely to win big!

Web Summary : Thane exit polls predict a Shinde Sena victory in the municipal elections. The BJP is expected to secure 26 seats, while Uddhav Sena may only get 3. Shinde's stronghold remains unchallenged, despite alliances.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे