शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

महापालिकेची यंत्रणा रात्रभर रस्त्यावर; खड्डे भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 16:19 IST

पालकमंत्री, आयुक्तांनी केली पहाटे ३ पर्यंत पाहणी

ठाणे: खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि श्री गणेशाचे आगमन खड्डेमुक्त रस्त्यांतून होण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. काल रात्रीपासून खड्डे भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पहाटे ३ वाजेपर्यंत या कामाची पाहणी केली.गेल्या काही दिवसांपासून शहरातील खड्डे भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु संततधार पाऊस आणि अवजड वाहतूक यामुळे परत खड्डे पडत आहेत. दिवसा खड्डे भरताना वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रात्रीच्यावेळी खड्डे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कालपासून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रात्री रस्त्यावर उतरली आहे. वाहतूक पोलीस शाखेच्या समन्वयातून रात्री खड्डे भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. रात्री खड्डे भरण्यासाठी वरिष्ठ अभियंत्यांची विविध पथके निर्माण करण्यात आली असून त्यांच्या निगराणीखाली खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत काल रात्री आनंदनगर नाका, तीन हात नाका पूल, नितीन कंपनी पूल, कॅसल मिल, मानपाडा जंक्शन, दोस्ती इंपिरिया, ब्रम्हांड, कोलशेत, ढोकाळी नाका, श्रीरंग सोसायटी, एसटी कार्यशाळा, खारटन रोड, मल्हार सिनेमा चौक या ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते. तीन दिवस चालणार विशेष मोहीमशहरातील खड्डे बुजवण्याची विशेष मोहीम तीन दिवस चालणार आहे. या तीन दिवसात रात्रीच्यावेळी जास्तीत जास्त खड्डे बुजवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या असून महापालिका आयुक्त स्वत: रात्री या कामाची पाहणी करणार आहेत.पालकमंत्र्यांनी केले आयुक्तांचे कौतुकखड्डे बुजवण्याच्या बाबतीत ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल करत असलेल्या कामाचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. विशेष म्हणजे महापालिकेच्या मालकीचे रस्ते नसतानाही केवळ वाहतूक कोंडी टळावी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी आयुक्त प्रयत्न करत आहेत, असे शिंदे म्हणाले.  

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाPotholeखड्डे