शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Thane Municipal Corporation: ठाणे शिंदेसेनेचेच... भाजप लहान भाऊ अन् उद्धवसेना भुईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 08:05 IST

युती असल्याने भाजपला यावेळी महापालिकेतील सत्तेत सहभागी होता येईल. 

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निकालात शिंदेसेनेचीच सरशी झाली असून, सहा जागांवर अगोदरच बिनविरोध नगरसेवक निवडून आलेल्या शिंदेसेनेची घोडदौड बहुमताच्या सत्तेकडे सुरू आहे. ४० जागांवर उमेदवार उभे केलेल्या भाजपला मागील वेळी गाठले तेवढे संख्याबळ गाठता येणार की नाही, याचीच उत्कंठा आहे. अर्थात शिंदेसेना व भाजपची निवडणूकपूर्व युती असल्याने भाजपला यावेळी महापालिकेतील सत्तेत सहभागी होता येईल. 

उद्धवसेनेची मोठी वाताहत झाली आहे. त्यामुळे ठाणे हे ठाकरेंचे नव्हे तर शिंदे यांचेच असल्यावर शिक्कामोर्तब झाले. मनसेला यावेळीही भोपळा फोडता आलेला नाही. मागीलवेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला विभाजनाचा व परस्पर विरोधी लढाईचा फटका बसला. राष्ट्रवादीच्या पतनाचा लाभ एमआयएमला झाला आहे. कळवा-मुंब्यातील राष्ट्रवादीच्या गडातील एमआयएमचा वाढता प्रभाव आ. जितेंद्र आव्हाड यांची चिंता वाढवणारा आहे.

मोठा भाऊ होण्याचे भाजपचे मनसुबे मिळाले धुळीला ठाणे पालिकेवरील वरचष्मा टिकवून ठेवण्यासाठी शिंदेसेनेने भाजपला जागांच्या वाटाघाटीतच रोखले. त्यामुळे ठाण्यात मोठा भाऊ होण्याचे भाजपचे मनसुबे धुळीला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील निवासस्थान ज्या प्रभागात येते तेथील शिंदेसेनेचा सलग सहावेळा विजयी होणारा उमेदवार उद्धवसेनेने पाडला. हीच काय ती उद्धवसेनेकरिता समाधानाची बाब.

भाजप २८ शिंदेसेना ७५ काँग्रेस 0 राष्ट्रवादी अजित पवार ९ राष्ट्रवादी शरद पवार १२ उद्धवसेना १ मनसे 0 वंचित 0 एमआयएम ५इतर १

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde's Sena Dominates Thane; BJP Smaller, Thackeray's Party Crumbles

Web Summary : Shinde's Sena triumphs in Thane, securing a majority. BJP's ambitions falter. Thackeray's party suffers a major setback. MIM gains ground, worrying NCP's Jitendra Awhad. Shinde's influence solidifies.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा