शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

ठाणे महापालिकेकडून रोज तब्बल ४९ एमएलडी पाण्याची नासाडी, लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 6:03 PM

ठाणे महापालिकेकडून प्रतीदिन तब्बल ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती समोर आली आहे. ही नासाडी टाळण्यासाठी पालिका आता काय उपाय योजना करणार हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.

ठळक मुद्देशहराला ४८५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठाअनेक जलवाहीन्या झाल्या जीर्ण

ठाणे - उन्हाळा सुरु झाला की जिल्ह्यासह ठाणे शहरालासुध्दा पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. परंतु ठाणे शहराला जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत लोकसंख्येच्या मानाने जास्तीचा पाणी पुरवठा होत आहे. असे असतांना शहरातील अनेक भागांना आजही पाण्यासाठी पालिकेकडे झगडावे लागत आहे. परंतु मुबलक पाणी असतांना सुध्दा केवळ नियोजनाच्या अभावामुळे महापालिकेकडून प्रतीदिन ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती समोर आली आहे.           ठाणे शहराची आजची लोकसंख्या ही २४ लाखांच्या घरात आहे. शहरातील सध्याच्या लोकसंख्येला ४३६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना शहरात त्यापेक्षा जास्त म्हणजे ४८५ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. परंतु असे असतांना सुध्दा सोमवारी ठाण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या कार्यालयावर पाणी पुरवठा होत नाही, म्हणून महिलांनी तक्रार केल्याची बाब समोर आली आहे. केवळ याच भागात नाही तर शहरातील इतर भागातही अनेक वेळा कमी दाबाने किंवा एक दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. सेंट्रल पिब्लक हेल्थ अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंट इंजिनीअरींग आॅर्गनायझेशनच्या नामांकनानुसार प्रत्येक व्यक्तीची दैनंदिन पाण्याची गरज ही १५० लीटर इतकी आहे. ठाण्याची सध्याची लोकसंख्या अंदाजे २४ लाख २१ हजार इतकी असून या लोकसंख्येची पाण्याची गरज ही ४३६ एमएलडी आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त पाणी पुरवठा शहराला होत असूनही अनेक ठिकाणी पाणी टंचाई भेडसावत आहे. २०१५ व २०१६ साली ठाणे शहराला रोज ४८० एमएलडी पाणी पुरवठा होत होता. त्या वर्षी अनुक्र मे पाण्याची गरज ही ४०६ आणि ४२१ एमएलडी इतकी होती. तर, २०१५ साली २१ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी ३९० एमएलडी पाण्याची गरज असताना ४६० एमएलडी पाणी पुरवठा होत होता अशी माहिती हाती पालिका सुत्रांनी दिली आहे. ठाणे महापालिकेला एमआयडीसी,स्टेम, मुंबई महापालिका आणि स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, शहरांत पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या या जीर्ण झाल्या असून जमिनीखाली मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. तर शहरातील काही ठिकाणी मीटरच्या माध्यमातुन बीलांचे वाटप होत आहे. तर काही ठिकाणी ठोक अशी बिले दिली जात आहेत. त्यामुळे कितीही पाणी वापर केला गेला याचा योग्य तो अंदाज बांधण्यात येत नाही. एकूणच ही नासाडी टाळण्यासाठी पालिका काय उपाय योजना करणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी