शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

ठाणे महापालिका डायरी : प्लास्टिक ते सोफासेट सारेच फेकतात नाल्यात!

By संदीप प्रधान | Updated: May 19, 2025 14:19 IST

नालेसफाईच्या ठेकेदारीत जसा भ्रष्टाचार आहे, तसाच प्लास्टिक पिशव्यांपासून अगदी घरातील खराब झालेले सोफासेट नाल्यात बिनदिक्कत फेकून देणारे आपण सारेच या पावसाळी पुराला जबाबदार आहोत...

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक -

पावसाळा जवळ येऊन ठेपला की, ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील नालेसफाईची कामे असमाधानकारक झाल्याच्या बातम्या यायला लागतात. प्रत्यक्ष मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर ज्या दिवशी मुसळधार पाऊस होतो तेव्हा रस्त्यांवर पाणी साचून ते झोपडपट्ट्या, बैठ्या वस्त्या, सहकारी सोसायट्यांमध्ये शिरते आणि न झालेल्या नालेसफाईच्या नावे बोटे मोडली जातात. नालेसफाईच्या ठेकेदारीत जसा भ्रष्टाचार आहे, तसाच प्लास्टिक पिशव्यांपासून अगदी घरातील खराब झालेले सोफासेट नाल्यात बिनदिक्कत फेकून देणारे आपण सारेच या पावसाळी पुराला जबाबदार आहोत. 

काही वर्षांपूर्वी ठाणे शहरातील एका मोठ्या नाल्यातील कचरा काढण्याकरिता जेसीबी उतरवला असता त्यातून खराब सोफासेट बाहेर काढला गेला. घरात नवीन सोफासेट आणल्यावर जुना सोफासेट नाल्यात फेकून देण्याची शक्कल सुचलेल्या व्यक्तीला साष्टांग दंडवत घातला पाहिजे. आपल्या घरात नकोसे झालेले कुठलेही सामानसुमान लोक मागचा- पुढचा अधिक विचार न करता ते सर्रास नाल्यात भिरकावतात. प्लास्टिक पिशव्या व नष्ट न होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू वापरू नयेत, याकरिता नियम, कायदे केले आहेत; परंतु महापालिकेकडील कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आपण सारेच बाजारात खरेदी करायला जातो तेव्हा कापडी पिशवी घेऊन जायला सोईस्करपणे विसरतो. मग विक्रेता हळूच दडवलेली प्लास्टिक पिशवी देतो. आपण उजळमाथ्याने हा कायदेभंग मिरवत घरी जिन्नस घेऊन येतो. नालेसफाईची कंत्राटे ही नेहमीच स्थानिक स्वराज्य संस्थांना अपेक्षित खर्चापेक्षा २० ते २५ टक्के कमी दराने दिली जातात. म्हणजे एक रुपयाचे काम ७५ पैशांत करायची तयारी कंत्राटदार दाखवतो. महापालिकेच्या अधिकारी, लोकप्रतिनिधींना लक्ष्मीदर्शन घडवल्यावर एक रुपया महापालिकेकडून घेणारा कंत्राटदार प्रत्यक्षात ३५ ते ४० पैशांचे काम करतो. नालेसफाईबाबत अधिकारी वर्गात एक दांडगा आत्मविश्वास आहे की, सुरुवातीला जेव्हा मोठा पाऊस येईल, तेव्हा पाण्यासोबत नाल्यातील कचरा वाहून जाईल. पण तो वाहून गेला नाही आणि एका तासात अनपेक्षितपणे आणखी मोठा पाऊस झाला, तर नालेसफाईची पोलखोल होते. 

जिल्ह्यातील नालेसफाईवरील खर्चठाणे महापालिका हद्दीत ३८४.९१ किमीचे नाले आहेत. यंदा त्यांच्या सफाईवर १० कोटी २९ लाख खर्च केले जाणार आहेत. कल्याण डोंबिवलीत ९५ मोठे नाले आहेत. त्यांच्या सफाईवर चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. उल्हासनगरात लहान-मोठ्या नाल्यांची लांबी २८० कि.मी. असून, गाळ काढण्यासाठी एक कोटी ३० लाखांची तरतूद आहे. भिवंडी महापालिका हद्दीतील नाल्यांची लांबी ४४ हजार ५६५ मीटर आहे. त्यांच्या सफाईवर दोन कोटी २७ लाख ९७ हजार रुपये खर्च होणार आहे. अंबरनाथ- बदलापूरमध्ये मोठे नाले २२ कि.मी.चे असून, त्याच्या सफाईवर ४० लाख खर्च केला जाणार आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका