Thane Municipal Commissioners controversial statement; Women councilors became aggressive | आयुक्तांच्या 'त्या' वादग्रस्त विधानाचे महापालिका सभेत पडसाद; महिला नगरसेवक आक्रमक

आयुक्तांच्या 'त्या' वादग्रस्त विधानाचे महापालिका सभेत पडसाद; महिला नगरसेवक आक्रमक

ठाणे : वॉट्सअपवर व्हायरल झालेल्या ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अधिकाऱ्यांवरील वादग्रस्त टीकेचे पडसाद आज झालेल्या सर्वसाधारण सभेतही उमटेले. अधिकाऱ्यांच्या कुटुंबियातील महिला सदस्यांबाबत पालिका आयुक्तांनी अपशब्दांचा वापर केल्याने ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा संदेश पाठवण्यात आला आहे त्यावर माहिला अधिकारी देखील असल्याने सभागृहातील महिला नगरसेविका कमालीच्या संतप्त झाल्या. अशाप्रकारे महिल्यांच्या संदर्भात अपशब्द वापरत असतील त्यावर कारवाईची मागणी महिला नगरसेविकांनी केली. विशेष म्हणजे पालिका सचिव अशोक बुरपुल्ले यांनी देखील या वृत्ताला सभागृहात दुजोरा दिल्यानंतर नगरसेवकांच्या भावनांचा विचार करून महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत अर्ध्या तासांसाठी सभा तहकूब केली. 

शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी हा मुद्दा उपास्थित केला. पालिका आयुक्तांच्या वादग्रस्त विधानाचा जो संदेश व्हायरल झाला आहे तो नेमका काय संदेश हे सभागृहाला देखील समजले पाहिजे अशी मागणी भोईर यांनी सभागृहात केली . तर अशाप्रकारे  ज्या ग्रुपवर महिला अधिकारी आहेत त्या ग्रुपवर एखाद्या अधिकाऱ्यांच्या  आई- बहिणीविषयी अशा प्रकारे वादग्रस्त विधान करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकारचा निषेध केला.

ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी देखील या प्रकारचा निषेध करत ३५ वर्षांमध्ये अशाप्रकारे व्हॉट्सअप ग्रुपवर वयक्तिक स्वरूपाची टीका झाली नसल्याचे त्यांनी सांगितले .त्यानंतर विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी देखील या सर्व प्रकारचा खुलासा करावा अशी मागणी सभागृहात केल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी पालिकेचे सचिव अशोक बुरपुल्ले याना सभागृहात असा काही प्रकार झाला आहे का याची खुलासा करण्याचे आदेश दिले. पालिका सचिवांनी देखील या सर्व प्रकाराला दुजोरा दिला असून अधिकाऱ्यांच्या महिला कुटूंबियांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले असल्याची कबुली त्यांनी दिली . अखेर महापौर नरेश म्हस्के यांनी महिला नगरसेवकांच्या भावना लक्षात घेऊन सर्वसाधारण सभा अर्ध्या तासांसाठी तहकूब केली .
 

Web Title: Thane Municipal Commissioners controversial statement; Women councilors became aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.