ड्युटी संपून घरी जाताना रोड अपघातात, ठामपा अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 20:26 IST2020-05-21T20:25:59+5:302020-05-21T20:26:37+5:30
राजपूत हे 2003 मध्ये ठामपा अग्निशमन दलात भरती झाले होते. सध्या ते कोपरी अग्निशमन दलात कार्यान्वित होते.

ड्युटी संपून घरी जाताना रोड अपघातात, ठामपा अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू
ठाणे : ड्युटी संपल्यावर दुचाकीने बाळकुल येथील घरी चाललेल्या ठामपाच्या कोपरी अग्निशमन दलाचे जवान मंगलसिंग राजपूत (42) यांचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फरार ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.
राजपूत हे 2003 मध्ये ठामपा अग्निशमन दलात भरती झाले होते. सध्या ते कोपरी अग्निशमन दलात कार्यान्वित होते. गुरुवारी ते ड्युटी संपून दुचाकीने ईस्टन एक्सप्रेस हायवे रोडवर घरी जात असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. या जोरदार धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीररीत्या जखम झाली होती. त्यांना तातडीने ठामपाच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षेचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली.