व्हेंटीलेटर्सच्या ठेक्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकारतांना ठाण्याच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 11:02 PM2021-04-08T23:02:49+5:302021-04-08T23:05:42+5:30

ठाणे महापालिकेच्या रुग्णालयासाठी दीड कोटींच्या व्हेंटीलेटर्सचा ठेका मिळवून देण्याच्या बदल्यामध्ये तब्बल पाच लाखांची लाच स्वीकारणारा ठामपाचा वादग्रस्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी राजू मुरुडकर याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) गुरुवारी रात्री अटक केली.

Thane medical health officer arrested for accepting Rs 5 lakh bribe for ventilator contract | व्हेंटीलेटर्सच्या ठेक्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकारतांना ठाण्याच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये सापळा

Next
ठळक मुद्दे नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये सापळा ठाणे एसीबीने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेच्या रुग्णालयासाठी दीड कोटींच्या व्हेंटीलेटर्सचा ठेका मिळवून देण्याच्या बदल्यामध्ये तब्बल पाच लाखांची लाच स्वीकारणारा ठामपाचा वादग्रस्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी राजू मुरुडकर याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) गुरुवारी रात्री अटक केली. त्याच्याविरुद्ध रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांसाठी ठामपाला ३० व्हेंटीलेटर्सची तातडीने खरेदी करायची होती. त्यासाठी प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करुन नवी मुंबईच्या एका कंपनीकडून चार लाख ९५ हजारांमध्ये एक असे ३० व्हेंटीलेंटर्स एक कोटी ४८ लाख ५० हजारांमध्ये खरेदी केले जाणार होते. हा ठेका या कंपनीला मिळवून देण्यासाठी या रकमेतील दहा टक्के रक्कमेची म्हणजे १५ लाखांची मागणी मुरुडकर याने या कंपनीच्या प्रतिनिधीकडे दोन दिवसांपूर्वी केली होती. कंपनीने ते मान्य करीत आधी पाच लाख आणि नंतर दहा लाख रुपये देण्याचे ठरले. यातील पहिला हाप्ता मुरुडकरला त्याच्या ऐरोली येथील एका खासगी रुग्णालयात देण्याचेही ठरले. दरम्यान, कंपनीने याबाबतची तक्रार ठाणे एसीबीकडे केली. याची पडताळणी झाल्यानंतर हाच पाच लाखांचा पहिला हाप्ता घेतांना त्याला गुरुवारी (८ एप्रिल रोजी ) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून लाचेची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अलिकडेच, मुंब्रा येथील म्हाडाच्या बंद असलेल्या रुग्णालयातील १४ कोटींची व्हेटीलेटर्स तसेच अन्य कोरोना संबंधीची वैद्यकीय सामुग्री लंपास केल्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजू मुरुडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल करण्यापूर्वीच डॉ. मुरुडकर याने ठामपाच्या रुग्णालयांमध्ये ठेवलेल्या या व्हेटीलेटर्ससह अन्य सामुग्री तातडीने म्हाडाच्या रुग्णालयात सुपूर्द केली होती. अर्थात, या सर्व बाबीसाठी पालिका प्रशासनाची पूर्व अनुमतीही घेतली होती, अशी सारवासारवही त्याने केली होती. पुन्हा एसीबीच्या या कारवाईने मुरुडकर याच्या अडचणीमध्ये आणखीनच वाढ झाली आहे.

Web Title: Thane medical health officer arrested for accepting Rs 5 lakh bribe for ventilator contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.