शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:44 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने मुंब्रा-शीळ भागातील गट क्रमांक १७८, १७९ आणि १८०, शीळ येथील १७ बेकायदा इमारतींवर १३ जूनपासून सलग चार दिवस कारवाई करण्यात आली.

ठाणे : न्यायालयीन स्थगितीची मुदत संपल्यानंतर ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक सोमवारी पुन्हा मुंब्रा-शीळ भागातील उर्वरित पाच इमारती पाडण्यासाठी पोहोचले असता त्याला इमारतींमधील रहिवाशांनी विरोध केला. या रहिवाशांनी नऊ तास पालिकेच्या पथकाला अडवून ठेवले. अखेर सायंकाळी ४ नंतर पोलिसांनी रहिवाशांना हटवले आणि दोन इमारती तोडण्यात आल्या, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने मुंब्रा-शीळ भागातील गट क्रमांक १७८, १७९ आणि १८०, शीळ येथील १७ बेकायदा इमारतींवर १३ जूनपासून सलग चार दिवस कारवाई करण्यात आली. त्यात १२ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यानंतर ४ इमारतींमधील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने कारवाईला स्थगिती न देता रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी २३ जूनपर्यंत मुदत दिली होती. 

ती सोमवारी संपताच ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पोलिस ताफ्यासह खान कंपाउंडमध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास पोहोचले. परंतु कारवाई होणार याची कल्पना आधीच रहिवाशांना असल्याने त्यांनी सकाळी ७ पासूनच येथे धरणे आंदोलन सुरू केले होते. महिला रहिवाशांना पुढे करत पालिकेच्या पथकाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप पालिकेने केला.

रहिवासी म्हणतात, आमची काय चूक ?

आम्ही अनेक महिन्यांपासून या इमारतींमध्ये राहत आहोत. आम्हाला नोटीस न देता पालिकेने कारवाई केली. इमारत बेकायदा होती, तर आम्हाला वीजजोडणी का दिली. इमारती बेकायदा आहेत, यात आमची काय चूक, अशी कैफियत रहिवाशांनी मांडली. पालिका अधिकारी आणि पोलिस यांनी रहिवाशांची समजूत काढता काढता सायंकाळचे ४ वाजले. 

अजूनही चार इमारती शिल्लक

१८ बेकायदा इमारतींपैकी सोमवारपर्यंत १४ इमारती पाडण्यात आल्या. उर्वरित ४ इमारतींमध्ये ७५ कुटुंबांचे वास्तव्य असून रहिवाशांची संख्या २००च्या आसपास असल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली. रहिवाशांची समजूत काढून पुन्हा मंगळवारपासून कारवाई सुरू करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. साडेपाच एकरांवर या इमारती बांधण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMumbai High Courtमुंबई हायकोर्टHomeसुंदर गृहनियोजन