शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ghodbunder Traffic Update: गायमुख घाट उतरणीवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत ११ वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 11:22 IST

Thane Ghodbunder Road Traffic Update: या अपघातामुळे ठाणे–घोडबंदर रोडवरील दोन्ही वाहिन्यांवर सुमारे दोन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांचे हाल झाले.

विशाल हळदे -Thane Ghodbunder Road Traffic Update: गायमुख घाट उतरणीवर शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. टाटा कंपनीचा सिमेंट वाहून नेणारा कंटेनर ठाण्याकडे येत असताना नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने बोरिवलीकडे जाणाऱ्या तब्बल ११ वाहनांना धडक देत अपघात झाला. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाला ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.४५ वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास गायमुख जकात नाक्याजवळ, घोडबंदर रोडवरील गायमुख घाट उतरणीवर टाटा कंपनीचा कंटेनर (MH 04 KF 0793) ठाण्याच्या दिशेने येत होता. सुमारे ३५ ते ४० टन सिमेंटच्या गोण्या वाहून नेणाऱ्या या कंटेनरने उतरणीवर नियंत्रण गमावल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर कंटेनरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला.

या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये रिक्षाचालक शिवकुमार यादव (वय ५६) यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, रिक्षामधील प्रवासी तस्किन शेख (वय ४५) व अनिता पेरवाल (वय ४५) यांना चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच कारचालक रामबली बाबूलाल (वय २२) यांना कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. सर्व जखमींना ओवळा येथील टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर काही वाहनांतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

अपघातात होंडा सिटी, व्हॅगनार, इर्टिगा, महिंद्रा XEV 9E, इनोवा, डिझायर, ब्रेझा, फोर्ड कार तसेच ऑटो रिक्षा अशा एकूण ११ वाहनांचे नुकसान झाले आहे. काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक गाड्यांच्या पुढील व मागील भागाची चांगलीच चुराडा झाली आहे.

अपघातग्रस्त वाहनांमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. घटनास्थळी कासारवडवली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले. अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर माती पसरवून पुढील अपघाताचा धोका टाळण्यात आला.

या अपघातामुळे ठाणे–घोडबंदर रोडवरील दोन्ही वाहिन्यांवर सुमारे दोन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांचे हाल झाले. अखेर अपघातग्रस्त सर्व वाहने रस्त्याच्या कडेला हटवण्यात आली असून सध्या घोडबंदर रोडवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

दरम्यान, कंटेनर चालकाचा शोध घेण्याचे काम कासारवडवली पोलीस करीत असून अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Major Accident on Ghodbunder Road: Container Collision Injures Four, Disrupts Traffic

Web Summary : A container truck lost control on Ghodbunder Road, colliding with eleven vehicles and injuring four. The accident caused a massive traffic jam. Injured were hospitalized, and traffic has returned to normal.
टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटलcarकारPoliceपोलिस