ठाण्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, 4 जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 10:35 IST2017-11-08T09:47:19+5:302017-11-08T10:35:30+5:30
ठाण्यातील चंदनवाडी (पाटीलवाडी) येथील राधाबाई चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

ठाण्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, 4 जण गंभीर जखमी
ठाणे - ठाण्यातील चंदनवाडी (पाटीलवाडी) येथील राधाबाई चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सिलिंडरच्या पाईपमधून गॅस गळती झाल्याने स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
चंदनवाडीतील राधाबाई चाळीतील ही घटना आहे. दगडू जाधव (वय 60 वर्ष ) यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा बुधवारी (8 नोव्हेंबर) सकाळी स्फोट झाला. यात दगडू जाधव यांच्यासह दर्शना जाधव (वय 50 वर्ष), प्रीती जाधव (वय 24 वर्ष ), तृप्ती जाधव ( वय 40 वर्ष ) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सिलिंडर स्फोटामुळे जाधव यांच्या घराची भिंतच कोसळली आहे. शिवाय, घरांच्या भिंतींनाही तडे गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.