शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

परवडण्याजोग्या घरखरेदीसाठी पहिली पसंती ठाण्यालाच; ५ वर्षांत किमतीचा कल चढाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 9:34 AM

एमएमआर हाउसिंग रिपोर्ट २०२१ हा नवीन अहवाल क्रेडाई एमसीएचआयने सीआरई मेट्रिक्सच्या सहयोगाने प्रकाशित केला आहे.

मुंबई : एमएमआरमधील रिअल इस्टेट बाजारपेठेतील सकारात्मक कल एमएमआर हाउसिंग रिपोर्टमध्ये दिसून आला असून,  या अहवालानुसार रिअल इस्टेट वार्षिक विक्रीच्या बाबतीत गेल्या चार वर्षांच्या (२०१७-२०२०) तुलनेने २०२१ (जानेवारी-डिसेंबर २०२१) हे वर्ष सर्वोत्तम असण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. 

एमएमआरमधील एकूण सदनिकांच्या विक्रीचा आकडा १,७१,१६५  इतका आहे. ऑगस्ट २०२१ पर्यंत त्याचे मूल्य १,३३,०१५ कोटी रुपये इतके आहे. हा कल पुढे सुरू राहून २०२१ हे विक्रम मोडणारे वर्ष ठरणार आहे, असा दावा केला जात आहे. गेल्या ५ वर्षांत ठाणे जिल्ह्यामध्ये घरांच्या किमतीत चढा कल दिसून आला. मुंबईच्या तुलनेने ठाणे ही परवडण्याजोगी बाजारपेठ आहे. गेल्या ५ वर्षांची तुलना करता येथील घराची किंमतदेखील वाढत आहे.

एमएमआर हाउसिंग रिपोर्ट २०२१ हा नवीन अहवाल क्रेडाई एमसीएचआयने सीआरई मेट्रिक्सच्या सहयोगाने प्रकाशित केला आहे. त्यानुसार, क्रेडाई - एमसीएचआयचे अध्यक्ष दीपक गोराडिया म्हणाले, स्टँप ड्यूटीमधील कपात, गृह कर्जाच्या दरांमधील घट, विकासकांकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या वित्त व इतर ऑफर्स आणि महामारीचा परिणाम म्हणून स्वतःचे घर असण्याला मिळालेले महत्त्व यामुळे हा कल दिसून येत आहे. जवळपास अर्ध्या दशकभर सपाट स्वरूपाची वाढ अनुभवास आल्यावर पहिल्यांदा या क्षेत्रात तेजी दिसून येत आहे आणि सध्याचा उत्सवी हंगाम पाहता या वर्षाच्या अखेरपर्यंत हा कल असाच राहील.

जानेवारी ऑगस्ट २०२१ या कालावधीतील विक्री ही २०१७, २०१८, २०१९ आणि २०२० या चारही वर्षांमधील विक्रीपेक्षा जास्त आहे.मूल्याचा विचार करता सुमारे ८० टक्के घरविक्री ही १ कोटीहून अधिक किंमत असलेल्या अपार्टमेंट्सची झाली. पश्चिम उपनगर हे मुंबईचे सर्वात मोठे मॅक्रो-मार्केट आहे. जानेवारी - ऑगस्ट २०२१ या कालावधीतील विक्री २०१७, २०१९ आणि २०२० या चारही वर्षांच्या विक्रीपेक्षा जास्त आहे.

टॅग्स :Homeघर