शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
2
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
3
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
4
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
5
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
6
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
7
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
8
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
9
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
11
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
12
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
13
२०२६ मध्ये पगारात वाढ होणार की वाट पहावी लागणार? आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट
14
"राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम..."; हिदायत पटेल हत्येवरून काँग्रेसची टीका
15
'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा
16
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
17
BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू
18
लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
19
India-Israel: पंतप्रधान मोदींना नेतान्याहूंचा फोन; दहशतवादाविरुद्ध भारत-इस्रायल एकत्र!
20
“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील प्रभाग समितीला आंबटशौकीन अधिकाऱ्याचा जाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 23:35 IST

महासभेत उघड झाली बाब; नगरसेविकांनी सांगितली आपबिती

ठाणे : वागळे प्रभाग समितीचा एक अधिकाºयाच्या वर्तवणुकीमुळे या समितीमधील महिला कर्मचारीआणि येथील नगरसेविकादेखील हैराण झाल्याची बाब मंगळवारी झालेल्या महासभेत उघड झाली. विशेष म्हणजे या अधिकाºयाकडून होणाºया वर्तवणुकीचे वर्णन करतांनाही महिलांच्या मनात लाज उत्पन्न होते असे त्या अधिकाºयाचे वागणे असून या अधिकाºयाला पुन्हा शासनाकडे पाठविण्याची मागणी यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. अखेर त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना पुन्हा शासनाकडे पाठविण्यात यावे, असे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले.वागळे प्रभाग समितीच्या अध्यक्षा शिल्पा वाघ यांनी या विषयाला सभागृहात वाचा फोडली. हा नवा अधिकारी सुरुवातीला आला तेव्हा चांगले काम करतो असे वाटत होते. मात्र, त्याचे प्रताप हळूहळू दिसू लागले. मागील चार महिन्यांपासून त्यांचे वर्तन अतिशय वाईट झाले असून महिला कर्मचारी दहशतीखाली काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. वागळे प्रभाग समितीच्या सर्व नगरसेविकांनीदेखील हाच सूर लावला. विशेष म्हणजे या सर्व प्रकारामध्ये पीडित एका महिलेला ब्रेन हॅमरेज झाल्याची धक्कादायक माहितीदेखील माजी महापौर अशोक वैती यांनी उघड केली. यासंदर्भात जर योग्य निर्णय घेतला गेला नाही तर एक शिवसैनिक म्हणून हे सर्व प्रकार हाताळण्यात येईल, असा पवित्रा वैती यांनी घेतला. त्यामुळे या अधिकाºयावर कारवाई झाली नाही तर आणि या महिलांना न्याय देता आला नाही तर शिवसेनेची नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्षा म्हणून राजीनामा देण्याइतपत भावना निर्माण झाली असल्याचे वाघ यांनी सांगितले.वरिष्ठांनी समज दिल्यावर वाढविले ‘आंबट’ प्रतापया सर्व प्रकाराच्या माहितीची यादीच प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना यासंदर्भात समजदेखील देण्यात आली होती. मात्र, हा प्रकार कमी होण्याच्या ऐवजी वाढला.अखेर हा विषय वाघ यांनी सभागृहात आणल्यानंतर त्यावर सर्वच नगरसेविकांनी त्यांची ठाणे महापालिकेतील सेवा संपुष्टात आणून त्यांना पुन्हा शासनाच्या सेवेत पाठवण्याची मागणी केली.यावर विरोधी पक्षनेत्यांनी हा ठराव मांडला तर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी अनुमोदन दिले. नंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्यांना पुन्हा शासनाच्या सेवेत पाठवण्याचे आदेश यावेळी प्रशासनाला दिले. तर यापुढे त्यांना प्रभाग समितीमध्ये येण्यास मज्जाव करावा असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाShiv Senaशिवसेना