शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

शेतकऱ्यांना कर्ज वाटपात ठाणे जिल्हा नापास; ठाणे जिल्हाधिका-यांची बँकाना तंबी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 19:55 IST

सुमारे २१३ कोटी १४ लाखांचे उद्दिष्ट असताना केवळ ८३ कोटी १४ लाख रुपयांचे जिल्ह्यात कर्जवाटप झाले. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून बँकांना या बैठकीत चांगलेच धारेवर धरले. पीकविमा योजनेत १४ हजार ५८५ शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी ४२ कोटी ७१ लाख रु पयांचा विमा उतरवलेल्याची माहितीही यावेळी उघड झाली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना पीककर्जवाटपासाठी २०१८-१९ साठी राष्ट्रीयीकृत बँकांना ७४ कोटी ८९ लाखांचे उद्दिष्ट खासगी व्यावसायिक बँकांना २२ कोटी २० लाखांचे उद्दिष्टमहाराष्ट्र बँकेने सहा कोटींपैकी केवळ एक कोटी ११ लाखजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ११० कोटींपैकी ६५ कोटी ४४ लाख रुपयांचे कर्जवाटप

ठाणे : राष्ट्रीयीकृत तसेच व्यावसायिक बँकांनी उद्दिष्टांच्या तुलनेत कर्जवाटपाची फार कमी प्रकरणे मंजूर केल्यामुळे ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी असमाधान व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणांसह दुर्बल घटकांचे कर्ज, अर्थसाहाय्य योजना आदी प्रकरणे प्रलंबित न ठेवता ती त्वरित मंजूर करण्याची तंबीही त्यांनी दिली. बँकांच्या कामकाजासह कर्जवाटपाची गती वाढवण्यासाठी बँक अधिकाऱ्यांची लवकरच कार्यशाळा आयोजित करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.शेतकऱ्यांना पीककर्जवाटपासाठी २०१८-१९ साठी राष्ट्रीयीकृत बँकांना ७४ कोटी ८९ लाखांचे उद्दिष्ट आहे. मात्र, त्यांनी केवळ सहा कोटी सात लाखांचे पीककर्जवाटप केल्याचे उघडकीस आले. खासगी व्यावसायिक बँकांना २२ कोटी २० लाखांचे उद्दिष्ट असताना त्यांनीही १० कोटी ५२ लाखांचे कर्जवाटप केले आहे. महाराष्ट्र बँकेने सहा कोटींपैकी केवळ एक कोटी ११ लाख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ११० कोटींपैकी ६५ कोटी ४४ लाख रुपयांचे कर्जवाटप केल्याचे या आढावा बैठकीत उघड झाले. सुमारे २१३ कोटी १४ लाखांचे उद्दिष्ट असताना केवळ ८३ कोटी १४ लाख रुपयांचे जिल्ह्यात कर्जवाटप झाले. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून बँकांना या बैठकीत चांगलेच धारेवर धरले. पीकविमा योजनेत १४ हजार ५८५ शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी ४२ कोटी ७१ लाख रु पयांचा विमा उतरवलेल्याची माहितीही यावेळी उघड झाली.सर्वसामान्य जनता, शेतकरी आदींसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवते. यासाठी अर्थसाहाय्य व कर्जवाटप बँकांच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे. राष्ट्रीयीकृत आणि व्यावसायिक बँकांनी नियमांचे काटेकोर पालन करावेच, परंतु अशी प्रकरणे कोणत्याही कारणास्तव प्रलंबित ठेवणे योग्य नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार ती प्रकरणे वेळेत निकाली काढून त्यात गतिमानता आणण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना सुनावले. पीककर्जवाटप केवळ ३९ टक्के झाल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पुढील महिन्यापर्यंत जास्तीतजास्त कर्जवाटप झाल्याचे दिसले पाहिजे, असे निर्देश दिले.बैठकीस ग्रामीण विकास यंत्रणेच्या पी.डी. सातपुते, कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे, जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने, महाबँकेचे निमकर तसेच राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.---------------

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी