ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०२ टक्के मिमी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 06:32 PM2018-09-20T18:32:26+5:302018-09-20T18:41:57+5:30

राज्यातील अन्य जिल्ह्यात ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पण जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण सरासरी १०२ टक्के असल्यामुळे दुष्काळापासून जिल्ह्याचा बचाव झाला आहे. पण मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी पडल्याचे निदर्शनात आले.

Thane district has an average of 102% mm. Rain | ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०२ टक्के मिमी. पाऊस

राज्यातील अन्य जिल्ह्यात ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. यामुळे अन्य जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील पावसाचे प्रमाण सरासरी १०२ टक्केदुष्काळापासून जिल्ह्याचा बचावपण मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी

ठाणे : जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ४९८.५८ मिमी पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी दोन हजार ४९९.७९ मिमी,अशी नोंद घेतली आहे.जिल्ह्याभरात यंदा १०२.०३ टक्के पाऊस पडला. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत आजच्या दिवसापर्यंत पावसाचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनात आले आहे. धरण साठाही कमी झाला आहे. अल्पावधीत पाऊस पडण्याची गरज आहे. अन्यथा संभाव्य पाणी टंचाईची शक्यता दिसून येत आहे.
राज्यातील अन्य जिल्ह्यात ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पण जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण सरासरी १०२ टक्के असल्यामुळे दुष्काळापासून जिल्ह्याचा बचाव झाला आहे. पण मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी पडल्याचे निदर्शनात आले. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत २२ हजार २६३.२० मिमी पाऊस पडला होता. यंदा तो १७ हजार ४९८.५० मिमी पडला. सुमारे ६८०.६७ मिमी पाऊस मागील वर्षाच्या तुलनेत कमी पडला आहे. आतापर्यंत सरासरी दोन हजार ४९९.७९ मिमी पाऊस पडल्याची नोंद यंदा जिल्हा प्रशासनाने केली आहे. यामुळे धरण साठा ही कमी झाला आहे. याशिवाय शंभर टक्के भरलेल्या धरणातील पाणी साठाही कमी झाला आहे. अल्पावधीत पाऊस न पडल्यास संभाव्य पाणी टंचाईची शक्यता दिसून येत आहे.

Web Title: Thane district has an average of 102% mm. Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.