ठाणे जिल्ह्यात सरासरी 191 मिमी पाऊस, धरणातील पाणीसाठ्यात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 01:21 PM2019-06-29T13:21:22+5:302019-06-29T13:26:14+5:30

ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तब्बल 1 हजार 336 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 191 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.

Thane district has received 191 of rainfall on 29 june | ठाणे जिल्ह्यात सरासरी 191 मिमी पाऊस, धरणातील पाणीसाठ्यात वाढ

ठाणे जिल्ह्यात सरासरी 191 मिमी पाऊस, धरणातील पाणीसाठ्यात वाढ

Next
ठळक मुद्दे ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तब्बल 1 हजार 336 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 191 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढत आहे.

ठाणे  - ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तब्बल 1 हजार 336 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 191 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढत आहे. रात्रभरात भातसा धरणात दीड टक्का ते बारवीत सव्वा दोन टक्के पाणीसाठा वाढला आहे. 

तानसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणातही पाणीसाठा पावसामुळे वाढला आहे. धरणांप्रमाणेच शहरी व ग्रामीण भागातील भिवंडी, कल्याण, ठाणे या तालुक्याप्रमाणेच  उल्हासनगरमध्ये सर्वाधिक 208 मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला आहे. 

पावसाची आकडेवारी 29 जून 2019 (मिलिमीटरमध्ये)

ठाणे           -  228.00mm
कल्याण     -  238.20mm
मुरबाड       -  55.00mm
उल्हासनगर - 208.00mm
अंबरनाथ    - 187.40mm
भिवंडी       - 250.00mm
शहापूर      - 170.00mm

एकूण - 1 हजार 336.60 मिमी

 

Web Title: Thane district has received 191 of rainfall on 29 june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.