शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी कार्यालयांमध्ये उपस्थित नसल्यामुळे ठाणे जि. प. सदस्यात  संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 19:01 IST

निधी खर्च न झाल्यामुळे जिल्हा परिषदेला मंजूर झालेला निधी मार्चअखेर शासनजमा होणार आहे. अधिकाºयांकडून वेळेत कामे केली जात नसल्यामुळे निधी पडून आहे. त्यातून कामे करून तो खर्च न केल्यामुळे शासन जमा होत असल्याच्या मुद्यावरून सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धरत त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची मागणी लावून धरली आहे.

ठळक मुद्देसुट्यांचे १८२ दिवस वर्षभरातकार्यालयीन कामकाजाचे दिवस १८३ अधिकारी भेटत नसल्यामुळे कोणतेही काम मार्गी लावता येत नाही

ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागाच्या कानाकोपऱ्यातून येणारा जिल्हा परिषद सदस्य मोठ्या कष्टाने जिल्हा परिषद कार्यालय गाठतो. पण कार्यालयांमध्ये अधिकारी भेटत नसल्यामुळे कोणतेही काम मार्गी लावता येत नाही. अधिकाऱ्यांच्या या गैरहजेरीविरोधात जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याअनुषंगाने या अधिकाऱ्याच्या कामकामाचे मूल्यमापन करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.       निधी खर्च न झाल्यामुळे जिल्हा परिषदेला मंजूर झालेला निधी मार्च अखेर शासनजमा होणार आहे. अधिकाऱ्याकडून वेळेत कामे केली जात नसल्यामुळे निधी पडून आहे. त्यातून कामे करून तो खर्च न केल्यामुळे शासन जमा होत असल्याच्या मुद्यावरून सदस्यांनी अधिकाऱ्याना धारेवर धरत त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची मागणी लावून धरली आहे. शाळा बांधकामांचे, रस्त्यांचा निधी, लघूपाटबंधारे आदी विभागाचा निधी परत जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे सदस्यांमध्ये या कामचुकार अधिकाऱ्यावर विरोधात रोष निर्माण झाला आहे.       जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन कामकाजाचे दिवस १८३ आहेत. सुट्यांचे १८२ दिवस वर्षभरात आहे. कामकाजाच्या सहा महिन्याच्या कालावधीत काम करायचे तर त्यासाठी तशी मानसिकता लागते. मात्र तसे होत नसल्यामुळे शासनाकडून प्राप्त झालेला निधी देखील वर्षभराच्या कालावधीत अधिकाऱ्याना खर्च करता येत नसल्याची खंत या लोकप्रतिनिधीकडून व्यक्त केली जात आहे. कार्यालयामध्ये कधीही गेले तरी अधिकारी टेबलवर बसलेला दिसत नाही. सदस्याना ही अधिकारी भेटत नसल्यास इतरांना तर ते कधीच वेळ देऊन त्यांची समस्या ऐकत नसल्याची खंतही सदस्यांनी व्यक्त करून अधिकाऱ्याविरोधात नाराजीचा सूर ऐकावला जात आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद