ठाणे जिल्ह्यात ६०४ रुग्णांची तर, १४ जणांच्या मृत्यूची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 10:14 PM2020-11-04T22:14:31+5:302020-11-04T22:14:40+5:30

ठाणे महानगर पालिका हद्दीत १६८ बाधितांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ४७ हजार ३१८ तर, मृतांची संख्या एक हजार १६१ वर गेली आहे.

In Thane district, 604 patients died and 14 died | ठाणे जिल्ह्यात ६०४ रुग्णांची तर, १४ जणांच्या मृत्यूची नोंद

ठाणे जिल्ह्यात ६०४ रुग्णांची तर, १४ जणांच्या मृत्यूची नोंद

Next

ठाणे :  ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांची वाढत्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६०४ वर आली असून १४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या दोन लाख १३ हजार ७६४ तर, मृतांची संख्या आता ५ हजार ४०१ झाली आहे.

ठाणे महानगर पालिका हद्दीत १६८ बाधितांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ४७ हजार ३१८ तर, मृतांची संख्या एक हजार १६१ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १२८ रुग्णांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. कल्याण डोंबिवलीत ९४ रुग्णांसह १ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये ५६ रुग्णांची तर, १ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात ४५ बधीतांची नोंद करण्यात आली. तसेच उल्हासनगर २३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.अंबरनाथमध्ये २४ रुग्णांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  तर, बदलापूरमध्ये २४ रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात ४२ रुग्णांची तर,५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या १७ हजार ७ तर मृतांची संख्या ५४५ वर गेली आहे.

Web Title: In Thane district, 604 patients died and 14 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.