शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात शनिवारी 1822 नवीन रुग्ण वाढले, तर 43 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 20:42 IST

जिल्ह्यात शनिवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात 475 नवीन रुग्णांची तर, 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

ठळक मुद्दे जिल्ह्यात शनिवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात 475 नवीन रुग्णांची तर, 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

ठाणे : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना दिसून येत आहे. त्यात गुरुवार, शुक्रवार प्रमाणे शनिवारी देखील बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. शनिवारी दिवसभरात 1 हजार 822 नवीन रुग्णांसह 43 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात 65 हजार 927 बधीतांसह एक हजार 870 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात शनिवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात 475 नवीन रुग्णांची तर, 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 15 हजार 480 तर, मृतांची संख्या 240 वर पोहोचला आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 342  रुग्णांसह 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या 15 हजार 516 तर, मृत्यूची संख्या 567 वर गेली आहे. त्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 352 नव्या रुग्णांसह 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे बंधीतांची संख्या 11 हजार410 तर, मृतांची संख्या 340 इतकी झाली आहे.     मीरा भाईंदरमध्ये 168 रुग्णांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 6 हजार 408 झाली आहे.  तर, मृतांची संख्या 219 इतकी झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 57 बधीतांची तर, 2 जणांच्या मृत्यूची नोंद आज करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 3 हजार 63 तर, मृतांची संख्या 175 वर पोहोचली आहे. उल्हासनगर 148 रुग्णांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 5 हजार 432 तर, मृतांची संख्या 80 झाली आहे. अंबरनाथमध्ये 64 रुग्णांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 30 तर, मृतांची संख्या 116 वर गेली आहे. बदलापूरमध्ये 66 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 833 झाली. तर, ठाणे ग्रामीण भागात 150 रुग्णांची तर, एका जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 27 तर, मृतांची संख्या 107 वर गेली आहे. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या