Thane: संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचे निवेदन

By अजित मांडके | Updated: August 21, 2023 17:48 IST2023-08-21T17:47:18+5:302023-08-21T17:48:02+5:30

Sanjay Raut: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली असून, त्यांना तातडीने मनोरुग्णालयात दाखल करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षकांकडे केली आहे.

Thane: Demand to admit Sanjay Raut in psychiatric hospital, statement of BJP district president Sanjay Vaghule | Thane: संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचे निवेदन

Thane: संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचे निवेदन

- अजित मांडके 
ठाणे - बेताल व निराधार वक्तव्याने समाजात फुटीची बीजे रोवत समाजाच्या भावना भडकाविणाऱ्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली असून, त्यांना तातडीने मनोरुग्णालयात दाखल करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षकांकडे केली आहे.

वाघुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन दिले. या वेळी माजी नगरसेवक भरत चव्हाण, जयेंद्र कोळी आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्राच्या राजकारणात नावापुरत्या असलेल्या  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने बेताल व निराधार वक्तव्ये केली जात आहेत. केवळ प्रसारमाध्यमांत प्रसिद्धी करण्यासाठी नाहक टिप्पणी केल्या जात आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि विविध समाजांविरोधात वक्तव्य करून समाजात दुही पसरविणे व समाजाच्या भावना भडकविण्याचे उद्योगही संजय राऊत यांच्याकडून केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लिहिलेल्या अग्रलेखाविरोधात राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, याकडे वाघुले यांनी निवेदनात लक्ष वेधले आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्यावर मानसिक उपचार करण्याची गरज आहे तरी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Thane: Demand to admit Sanjay Raut in psychiatric hospital, statement of BJP district president Sanjay Vaghule